संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र
*"एक दिवस बळीराजा साठी"* अंतर्गत
डॉ. खिजर बेग सर मा. संचालक संशोधन,
वनामकृवि, परभणी, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे,
डॉ. बी. एस. कलालबंडी, प्राध्यापक,उद्यानविद्या महाविद्यालय,
डॉ. पपीता गौरखेडे, मृदा शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प,
डॉ. आनंद दौंडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ, भाजीपाला संशोधन केंद्र,
यांनी आज दि. ११ जुन २०२५ बुधवार, रोजी मौजे. नांदगाव ता. जि. परभणी येथील
श्री. अच्युतराव जवंजाळ यांच्या
शेतावर भेट देऊन, केळी, ऊस, खजूर पिकांची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले.
यामध्ये केळी पिकात अती वाऱ्यामुळे झालेले नुकसान कमी करण्याचे उपाय, केळीची अतिरिक्त वाढणारी पील काढण्याचे अवजार, खरीप पिकांचे नियोजन, विविध वाण,
खरीप पिकासाठी बीज प्रक्रिया, ऊस पिकात पाचट कुजवणे, खोडवा पिकासाठी आधुनिक यंत्र इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली.
याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment