माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत कार्यक्रम निमित्त मु.पो.लोहारा ता. उदगीर येथे गळीत धान्य संशोधन केंद्र,लातूर येथील शास्त्रज्ञ आणि शेतकरी बांधव उपस्थित
दिनांक 09/01/2025 रोजी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत उदगीर तालुक्यातील रावणगाव या गावात तूर पिकात शेती दिनाचे आयोजन करण्यात आले . या शेतीदिनामध्ये तूर पिकातील गोदावरी या जातीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले . या बांधावर आयोजित केलेल्या शेती दिनामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या भागातील प्रश्न उपस्थित केले . या अनुषंगाने विद्यापिठातील शास्त्रज्ञानी आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले . विस्तार कृषि विद्यावेत्ता विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .
तूर पिकाची आवड जोपासता यावी तेजस खरात सोलनापुरकर पैठण माझे शिक्षण झाल्यावर प्रथमच वर्ष 2023 खरीप हंगामात शेती करण्याचा प्रसंग आला शेती वडिलोपार्जित आहे घरात शेती विषयी चर्चा ऐकायला येत होती शेतीसाठी साधन सामुग्री जुळवने इतके सोपे नसते असे वडील मला सांगत होते माझे मामा श्री मदन आबा शिंदे राहाटगावकर हे गेली 10 वर्षापासून उत्तम तूर शेती करतात त्यांना बी डी एन 711 हा कृषि संशोधन केंद्र बदनापूर निर्मित फार आवडायचा माझी त्यांची चर्चा झाली त्यांनी मला पैठण रोड वरील बियाणे विक्री केंद्राचा न दिला मी संपर्क केला बियाणे उपलब्ध झाले पण मला त्या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्ही गोदावरी वाणाची लागवड केली या वानामुळे माझी पहिल्याच वर्षी शेती करण्याची उमेद वाढली चार एकरात 40 क्विंटल उत्पादन मिळाले 8 हजार रु भाव मिळाला पहिल्याच प्रयत्न फलदायी ठरले त्यामुळे मग खरीप 2024 मध्ये 8 एकर तूर गोदावरी वाणाची लागवड केली आहे पीक चांगले आले आहे उत्पादन चांगले नक्की येईल पण या पिकाचे दर किमान आधारभूत किमतीच्या खाली येणार नाही हीच एक अपेक्षा आहे संशोधक , विस्...
Comments
Post a Comment