कृषि महाविद्यालयात संभाजीनगर
माझा एक दिवस माझ्या बळीराजा.सोबत
आजच्या या नियोजित उपक्रमासाठी छत्रपती संभाजी नगर तालुका आणि जिल्हा ही संभाजीनगर असलेले अशा काद्राबाद या गावाची निवड करण्यात आली या गावात कृषि दूत म्हणून कृषी महाविद्यालय बदनापूर येथील रावे उपक्रमातील विद्यार्थीही उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांसोबत या विद्यार्थ्यांना डॉ एस बी पवार विस्तार कृषि विद्यावेता यांनी मार्गदर्शन केले
कृषि महाविद्यालयात घेतलेले आजवरचे कृषि शिक्षण आणि शेतकरी आपल्या शेतात राबवित असलेले कृषि तंत्रज्ञान याचा एक तुलनात्मक अभ्यास करण्याची संधी प्राप्त झालेली आहे
शेतकरी बांधवांसोबत आपुलकी ठेवा त्यांचे शेती प्रश्न समजून घ्या त्यांना मार्गदर्शन करा, जे समजत नाही त्यासाठी आम्हाला विचारा यावेळी कापूस आणि मोसंबी तूर आदी क्षेत्राची पाहणी करत शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या या वेळी त्यांच्या सोबत डॉ ज्ञानदेव मुटकुळे आणि रामेश्वर ठोंबरे होते
Comments
Post a Comment