रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया


तूर पिकाची आवड जोपासता यावी

तेजस खरात सोलनापुरकर पैठण

माझे शिक्षण झाल्यावर प्रथमच वर्ष  2023 खरीप हंगामात शेती करण्याचा प्रसंग आला शेती वडिलोपार्जित आहे घरात शेती विषयी चर्चा ऐकायला येत होती  शेतीसाठी साधन सामुग्री जुळवने इतके सोपे नसते असे वडील मला सांगत होते

माझे मामा श्री मदन आबा शिंदे राहाटगावकर हे गेली 10 वर्षापासून उत्तम तूर शेती करतात त्यांना बी डी एन 711 हा कृषि  संशोधन केंद्र बदनापूर निर्मित फार आवडायचा माझी त्यांची चर्चा झाली त्यांनी मला पैठण रोड वरील बियाणे विक्री केंद्राचा न दिला मी संपर्क केला बियाणे उपलब्ध झाले पण मला त्या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्ही गोदावरी वाणाची लागवड केली

या वानामुळे माझी  पहिल्याच वर्षी शेती करण्याची उमेद वाढली चार एकरात 40  क्विंटल उत्पादन मिळाले 8 हजार रु भाव मिळाला  पहिल्याच प्रयत्न फलदायी  ठरले त्यामुळे

मग खरीप 2024 मध्ये 8 एकर तूर  गोदावरी वाणाची लागवड केली आहे पीक चांगले आले आहे  उत्पादन चांगले नक्की येईल

पण या पिकाचे दर किमान आधारभूत किमतीच्या खाली येणार नाही हीच एक अपेक्षा आहे  संशोधक , विस्तारक यांचे प्रयत्न फलदायी ठरतात  आता या पिकाला किमान 8 ते 9 हजार रु प्रती क्विंटल दर मिळावे हीच अपेक्षा आहे

अतिशय सरळ साधे आणि सोपे शिवाय शेतकरी वर्गाला आरामात शेती साठी पीक म्हणजे तूर होय 


तेजस खरात

गोदावरी तूर उत्पादक

सोलनापुर पैठण

अविनाश तूपकरी विहामांडवा हे माझे 6 व 7 जिल्हा परिषद हायस्कूल  मित्र आहे मला म्हणाले मी एक झाड तुझ्या बियाणे विक्री कार्यालयात गोदावरी वाणाचे पाठवतो त्याला जपून ठेव रे रामेश्वरा असा तो फोन करत म्हणाला

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली