संचालक विस्तार शिक्षण
माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमा अंतर्गत आज मौजे टाकळखोपा, तालुका :जिंतूर येथे माननीय संचालक विस्तार शिक्षण डॉ.आर.डी. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस व हळद पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विस्तार कृषी विद्यावेता तथा व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र डॉ.गजानन गडदे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक तसेच हळद व कापूस पिकातील खत व्यवस्थापनाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच कीटक शास्त्रज्ञ श्री मधुकर मांडगे यांनी सोयाबीन कापूस व हळद पिकात येणाऱ्या हुमणी किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेटारायझियम बुरशीचे एकरी ४ किलो किंवा ४ लिटर ची आळवणी करण्याचे सांगितले. या प्रसंगी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.पी आर देशमुख,तालुका कृषी अधिकारी जिंतूर श्री नितीन घुगे ,मंडळ कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment