Interaction with farmers at village Shelgaon Tq. Loha dist. Nanded. Three scientists, two staff and 34 farmers participated in discussion on nutrient, pest & disease management of kharif crops.
दिनांक 09/01/2025 रोजी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत उदगीर तालुक्यातील रावणगाव या गावात तूर पिकात शेती दिनाचे आयोजन करण्यात आले . या शेतीदिनामध्ये तूर पिकातील गोदावरी या जातीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले . या बांधावर आयोजित केलेल्या शेती दिनामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या भागातील प्रश्न उपस्थित केले . या अनुषंगाने विद्यापिठातील शास्त्रज्ञानी आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले . विस्तार कृषि विद्यावेत्ता विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .
*"एक दिवस बळीराजा साठी"* अंतर्गत डॉ. खिजर बेग सर मा. संचालक संशोधन, वनामकृवि, परभणी, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. बी. एस. कलालबंडी, प्राध्यापक,उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. पपीता गौरखेडे, मृदा शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डॉ. आनंद दौंडे, वरीष्ठ शास्त्रज्ञ, भाजीपाला संशोधन केंद्र, यांनी आज दि. ११ जुन २०२५ बुधवार, रोजी मौजे. नांदगाव ता. जि. परभणी येथील श्री. अच्युतराव जवंजाळ यांच्या शेतावर भेट देऊन, केळी, ऊस, खजूर पिकांची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले. यामध्ये केळी पिकात अती वाऱ्यामुळे झालेले नुकसान कमी करण्याचे उपाय, केळीची अतिरिक्त वाढणारी पील काढण्याचे अवजार, खरीप पिकांचे नियोजन, विविध वाण, खरीप पिकासाठी बीज प्रक्रिया, ऊस पिकात पाचट कुजवणे, खोडवा पिकासाठी आधुनिक यंत्र इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली. याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment