मौजे साळापुरी ता. जि. परभणी येथे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. इंद्रमणी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृषी महाविद्यालय गोळेगाव चे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे,डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. गजानन गडदे, डॉ. अनंत लाड उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे माजी विस्तार कृषी विद्यावेता डॉ. उद्धव आळसे, प्रा. उद्धव घाटगे, डॉ. डीएम नाईक, डॉ. खरवडे तसेच परभणीचे डॉ. रामेश्वर नाईक डॉ केदार कटिंग प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकांत वरपूडकर व इतर मान्यवर उपस्थित होते