NAEP, Ch Sambhajinagar, ARS badnapur

 माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत 





आजच्या उपक्रमासाठी डॉ एस बी पवार  विस्तार कृषिविद्यवेता  यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे फेरन जळगाव  ता जी छत्रपती संभाजीनगर या गावची  निवड करण्यात आली या गावात तूर गोदावरी वाणाची लागवड करणारे शेतकरी होते अशा सर्व शेतकऱ्यांना आणि गावातील इतर शेतकऱ्यांना  गोदावरी वान लागवड केलेल्या क्षेत्रांत एकत्रित केले या सर्व शेतकरी बांधवाना तूर पिकाचे कोरडवाहू  बी डी एन 711 आणि बागायती  गोदावरी या वाणाचे महत्व सांगण्यात आले या वेळी शेतकऱ्यांना डॉ एस बी पवार डॉ दीपक पाटील आणि श्री प्रकाश देशमुख यांनी मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आणि येत्या खरिपात नक्की आमच्या गाव शिवारात तूर पिकाचे क्षेत्र आणखी वाढेल असे उस्फूर्त मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले


श्री नानासाहेब हिवराळे गाव फेरन जळगाव ता जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतात कार्यक्रम संपन्न झाला


*छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तूर पिकाचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे*


*प्रकाश देशमुख यांची तूर गोदावरी शेती दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन*



जिल्ह्यात कुठे तरी दिसणारे तूर पिकाचे क्षेत्र हळू हळू जिल्ह्याच्या चारही दिशेने विस्तार होत आहे याल खास  कारण आहे ते कृषि संशोधन केंद्र बदनापूर यांनी निर्माण केलेले बी डी एन 711 आणि गोदावरी  वान निर्मिती आणि तितकीच  दर्जेदार बियाणे उपलब्धता सुविधा  यामुळे हे वान शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळेवर  उपलब्ध झाल्याने  शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध झाले यामुळे क्षेत्र वाढ आणि उपत्तदान वाढ झाली आहे हे मी मागील  आठ  वर्षापासून पाहत आहे या वर्षी  एक लक्ष हेक्टरवर कपाशी क्षेत्र कमी झाले त्या क्षेत्रात देखील शेतकऱ्याने तूर पिकाची पेरणी करत असल्याची माहिती आज दिनाक 10 डिसेंबर रोजी  गोदावरी शेती दिनाच्या निमित्ताने मौजे  फेरन जळगाव येथे केले

या पाहणी साठी विस्तार कृषि विद्यावेता डॉ सूर्यकांत पवार  बदनापूर केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ दीपक पाटील  मंडळी उपस्थित होते

या चालू खरिपात नाना हिवराळे  यांनी प्रथमच तूर गोदावरी वाणाची लागवड केली या क्षेत्राची पाहणी तज्ञांनी केली या  गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी मंडळी उपस्थित होते


डॉ सूर्यकांत पवार म्हणाले की इतर खरीप पिकाच्या तुलनेत या पिकाचे उत्पादन खर्च कमी आहे आणि दर ही चांगले मिळतात  दुसरी व्यवस्थापन पद्धती सोपी आणि महत्वाचे म्हणजे हे पिक आपली जमीन सुपीक करणारे पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोर्डवाही शेतीत बी डी एन 711 आणि बागायती शेतीत  गोदावरी वाणाची लागवड करावी असे उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले


डॉ दीपक पाटील म्हणाले की या शेतात एका ठिकाणी चार झाडे दिसत आहे हे अधिक उत्पादन दृष्टीने नुकसान करणारे आहे  या वाणाची वाढ चौफेर असल्याने दोन ओळीतील आणि  रोपांतील अंतर हे योग्य ठेवले पाहिजे  पिकाची विरळणी करत एका ठिकाणी एक दोन रोपे ठेवली पाहिजे  या गावात गोदावरी वाणाची लागवड चांगलीच नजरेत येत आहे

या वेळी प्रगतशील शेतकरी सिंकदर जाधव यांच्या सह इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात होती

शेती दिन यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाचे शिवहरी देवरे आणि विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी प्रयत्न केले


Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र