माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या उपक्रमात विस्तार कृषि विद्यावेता डॉ सूर्यकांत पवार यांचे मार्गदर्शन
शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड करावी
जिल्ह्याच्या शेतीत कापूस आणि मका ही एकच एक पीक पद्धती क्षेत्र मोठ्या प्रमाणात नजरेत येत आहे मागील अनेक वर्षापासून सतत हीच पिके घेतल्याने या पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे शिवाय अपेक्षित प्रति हेक्टरी उत्पादनही आता पूर्वीसारखे मिळत नाही उत्पादन खर्चात मोठी वाढ दिसून येत आहे त्यामुळे येत्या खरिपात कापूस , मका या पिकाऐवजी काही प्रमाणात तूर पिकाची निवड योग्य राहील असे मार्गदर्शन आज माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमात मौजे वाकी देवाची तालुका कन्नड येथे तूर गोदावरी पिक पाहणी दरम्यान केले या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख , रामेश्वर ठोंबरे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठी , मंडल कृषीअधिकारी राजमहेंद्र डोंगरदिवे यांच्यासह मंडळातील कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते मौजे वाकी गावात खरीप 2025 मध्ये 20 शेतकऱ्यांनी गोदावरी या तूर वाणाची लागवड केली होती त्या मधील श्री ज्ञानेश्वर गावंडे यांच्या तूर गोदावरी शेतावर आज तूर शेतीदिनाचे आयोजन केले होते या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते
चिरंतर चालणारा व्यवसाय म्हणजे शेती
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांचे तूर शेती दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन
शेती व्यवसायात आज बदलत्या हवामानात शेतकऱ्यांना शेती करणे कठीण जात आहे हे वास्तव पण बदलत्या हवामानात पिक पद्धतीची निवड करणे याची सोय आपल्या कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान देत आहे शिवाय महत्वाचे म्हणजे शेतीत पिकणारे अन्नधान्य हे कोणतेही कारखानदार निर्मिती करू शकत नाही त्यामुळे सर्वात शाश्वत आणि निरंतर चालणारा असा हा आपला शेती व्यवसाय आहे तो चांगला करण्यासाठी अनेक संकल्प पुढे येत आहे त्यात एकत्रित समान विचारसरणीने एकत्र येत गट शेती ही देखील काळजी गरज आहे पूर्वी खेड्यात मोठ्या प्रमाणात संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती त्यात कारभाऱ्याकडून काही गोष्टी करत असताना कुटुंबातील इतर सदस्यांच्या भावना न जपल्याने एक समृद्ध कुटुंब पद्धतीने आपली विभक्त रूपात आपल्याला दिसत आहे ही चूक आता गटशेती पद्धतीत चूक न करता शेती पद्धती करावी असे मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर ठोंबरे यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी गावातील सरपंच ज्ञानेश्वर पल्हाळ , उपसरपंच सुनंदाताई जंजाळ ,तंटा मुक्तीचे अध्यक्ष विठ्ठल नाना जंजाळ शेतकरी ज्ञानेश्वर गावंडे यांनी यशस्वितेसाठी कृषी विभागास सहकार्य केले
या गावाचे क्षेत्रीय अधिकारी अमोल राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले
रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर



Comments
Post a Comment