कृषी विज्ञान केंद्र खामगाव
दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र खामगाव व सिंदफणा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड उमापूर यांच्या संयुक्त विद्यमान एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम मालेगाव बुद्रुक येथे राबविण्यात आला .या कार्यक्रमांमध्ये प्रा. किशोर जगताप यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबरोबर जोडधंदे, माती परीक्षण, तसेच मातीची सुपीकता या विषयी सविस्तर अशी माहिती सांगितली. या कार्यक्रमास अशोक कल्याणराव पठाडे (पी.एम किसान राष्ट्रीय पुरस्कार विजेता), शिवाजी बापूराव गंगाधर, संतोष राख तसेच किशोर प्रल्हाद औटी यांची उपस्थिती लाभली.