Posts

Showing posts from December, 2023

मटकऱ्हाळा

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मटकऱ्हाळा  ता.जि. परभणी येथे हरभरा, रबी ज्वारी,तुर या पिकांची अवकाळी पावसानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन  करताना डॉ.धर्मराज गोखले, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पी.आर.देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, डॉ.गजानन गडदे, विस्तार कृषी विद्यावेता , डॉ.प्रभाकर पडघान प्रभारी अधिकारी सं.गौ.प्रकल्प, डॉ.रामप्रसाद खंदारे सहयोगी प्राध्यापक,श्री. एम.बी.मांडगे व.सं. सहायक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व रिलायन्स फाउंडेशनचे श्री.रामा राऊत यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली. सदरील कार्यक्रमास मटकऱ्हाळा गावातील जवळपास 80 शेतकरी उपस्थित होते. यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रक्षेत्र भेटी देण्यात आल्या व त्यांचा समस्यांचे निराकरण करण्यात आले.

बळीराजासाठीचा आजचा दिवस सार्थकी ठरला

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध पिकाचे संशोधन करतात हे संशोधन जेव्हा खरे शेतकऱ्याच्या शेतात डोलाने दिसेल तेव्हा ते खरे  सिद्ध झाले असे म्हणता येईल आज माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात आला यासाठी बहुतेक सर्वच कार्यालय यात उत्साहाने सहभागी झाले अगदी क्षेत्रीय कर्मचारी बांधावापासून ते थेट कुलगुरू महोदया पर्यंत सर्वच सहभागी असल्याचे दिसून आले प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील गावात शेतात जावून शेतकऱ्याची आदराने विचारपूस करत चर्चा केली नुकताच अकाली पाऊस झाला ठिकठिकाणी तो खूप झाला, काही ठिकाणी गारपीट ही झाली आणि या मुळे नेमकी विद्यापीठ म्हणून काय भूमिका असावा यासाठी आदरणीय कुलगुरू डॉ इंद्रमनी सर  संचालक विस्तार शिक्षण डॉ धर्मराज गोखले सर यांनी अगोदर  या परिस्थितीत सर्व जेष्ठ कृषि शास्त्रज्ञाची ताते डीची बैठक मुख्यालयी परभणी येथे घेतली पीक परिस्थिती नुसार नेमकी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे उपयुक्त तंत्रज्ञान  विषयानुसार कोणत्या शिफारशी आहेत त्याची चर्चा झाली मग यानुसार एक निश्च

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने राबविला एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम

Image
मराठवाडा विभागांतर्गत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि,परभणीच्या वतीने *वझुर ता.पुर्णा* जि.परभणी येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.यावेळी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या विविध पिकांची पाहणी करुन उपाय योजना सुचविण्यात आल्या. तसेच गावातील *डेअरी फार्म, रामेश्वर दूध संकलन केंद्र, अवनी फूडस् दालमिल  आदी कृषिपुरक व्यवसाय*  केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध अडचणी समजावून घेत त्यावर उपाय योजना सुचविण्यात आल्या.तसेच अवकाळी पाऊस झाल्याने उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपले मनोबल कसे वाढवावे याबाबत  *डाॅ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य ,  डाॕ.विद्यानंद मनवर आणि प्रा.ज्योती मुंडे*  यांनी उपस्थितांना सदरील प्रक्षेत्र भेटीदरम्यान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वझुर गावातील *प्रगतीशील शेतकरी रमेश पवार,नामदेव पवार,श्रीकांत शिंदे, भारत पवार,राहूल पवार* यांच्यासह गावातील 35 ग्रामस्थ  उपस्थित होते.

अ. भा. स. कोरडवाहु शेती संशोधन योजना व सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र

Image
अ. भा. स. कोरडवाहु शेती संशोधन योजना व सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी* तर्फे आज  दि. 02.12.2023 रोजी *" माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत"* या उपक्रमा अंतर्गत मौजे   *आडगाव,* ता.वसमत जि. हिंगोली येथे हरभरा, रबी ज्वारी, तुर, भाजीपाला पिके यामध्ये अवकाळी पावसानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  **डॉ. हनवते,* वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी बदलत्या हवामानात पीक व्यवस्थापन व पर्यायी पिकांबाबत मार्गदर्शन केले. इतर पिकांचा पर्याय यावरही मार्गदर्शन केले.    **डाॅ. जावळे,* वरिष्ठ संशोधन सहयोगी, यांनी सेंद्रिय शेती मधील पिकांची लागवड, त्यांचं व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण सेंद्रिय पद्धतीने कसे करावे या बद्दल विस्तृत माहिती दिली. *श्री. मंगेश राऊत* , कनिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी महाराष्ट शासन द्वारे शेतकऱ्यानं करीता असलेल्या योजना याबाबत माहीती दिली.  *श्री. सुमित सूर्यवंशी,* YP1 यांनी माती परीक्षण व त्याद्वारे पसरणारे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन यावर माहीती दिली. यावेळी अडगाव येशील *श्री. सुनील चव्हाण, अजय चव्हाण, ज्ञ

काटगाव तालुका:- तुळजापूर जि. उस्मानाबाद

Image
माझा एक दिवस बळीराजासाठी शेतकरी नाव:- शैलेश पाटील गाव:-काटगाव  तालुका:- तुळजापूर जि. उस्मानाबाद पिके:-कांदा, पालक, द्राक्ष,तूर सहभागी शास्त्रज्ञ:- डॉ दर्शना भुजबळ,  कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर

कोंडसी जि.हिंगोली

Image
माझा एक दिवस बळीराजा साठी कार्यक्रम अतर्गत डॉ. पेरके डॉ. धमक डॉ. कलालबंडी श्री. मुंडे श्री. मडावी श्री राठोड यांचा कोंडसी जि.हिंगोली येथील बळीराजा सोबत सहवास व त्यांना मार्गदर्शन.

मौजे भातागली , गंगापूर तालुका लातूर

Image
दि. ०२/१२/२०२३ *"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी"* या उपक्रमा अंतर्गत मौजे भातागली , गंगापूर तालुका लातूर येथे हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा या पिकामध्ये अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी व मार्गदर्शन करताना प्रा. अरुण गुट्टे , कृषी विद्यावेता , कृषी विद्यापीठ परभणी व तालुका कृषी अधिकारी श्री राऊत साहेब 

नांदगाव बुद्रुक ता. जि. परभणी

Image
नांदगाव बुद्रुक ता. जि. परभणी येथे हरभरा पिकात मर रोग व्यवस्थापनावर माहिती देतांना

कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर

Image
कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर* तर्फे आज  *दि.०२.१२.२०२३* रोजी  *माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी* या उपक्रमा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मौजे *कुंबेफळ, मंगरूळ, पिंपरीराजा* येथे प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.  यावेळी डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), डॉ.बस्वराज पिसुरे,विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी शेतकऱ्यांना कापूस, हरभरा, रबी ज्वारी, तुर, मोसंबी, द्राक्ष, भाजीपाला पिके यामध्ये अवकाळी पावसानंतर घ्यावयाची काळजी याबाबत तसेच पशुधनाची काळजी, चारा व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनीची गरज, केव्हीके येथे उपलब्ध विविध सुविधा याबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषि अधिकारी श्री.आधापुरे सर, विस्तार अधिकारी श्री.जोशी सर, दोन्ही गावातील सरपंच, कृषिसेवक, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही गावात मिळून *१३० पेक्षा जास्त* शेतकरी, विद्यार्थी, महिला या अभियानात सहभागी होते. यावेळी प्रक्षेत्र भेट देऊन पीक पाहणी करण

भोसा , तालुका मानवत

Image
सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प परभणी द्वारे भोसा , तालुका मानवत येथे भेट .संत्रा व ऊस पिकासाठी अतिवृष्टी मुळे पाणी व्यवस्थापन, निचरा, खत व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन.

कृषि महाविद्यालय, बदनापूर

Image
कृषि महाविद्यालय, बदनापूरच्या वतीने आयोजित *"माझा एक दिवस बळीराजासाठी"* कार्यक्रमअंतर्गत अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर गोकुळवडी ता. बदनापूर जि. जालना येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना मा. कुलगुरू डॉ. इंद्र मणी सर समवेत सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राकेश अहिरे, डॉ. के. टी. जाधव प्रभारी अधिकारी कृषि संशोधन केंद्र डॉ. डी. के. पाटील, प्रा. बी. व्ही. पाटिल, डॉ. एस. जे. सुपेकर, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. एन. डी. देशमुख, डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. सांतोष पवार आदी.

मौजे तट्टू जवळा तालुका परभणी

Image
*"एक दिवस माझ्या बळीराजा साठी"* या उपक्रम अंतर्गत मौजे तट्टू जवळा तालुका परभणी येथे हरभरा, रब्बी ज्वारी,तुर फळबाग भाजीपाला पिके यावर अवकाळी पावसानंतर पीकाची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना डॉ लक्ष्मणराव जावळे डॉक्टर शिवाजीराव शिंदे डॉक्टर एस आर बुरकुले डॉक्टर प्रीतम भुतडा मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत जवार संशोधन केंद्र परभणी आणि उद्यानविद्या विभाग परभणी यावेळी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्रमाला हजर होते.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमास सुरुवात, माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र. मणि यांच्या हस्ते उद्घाटन

Image

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई

Image
"एक दिवस माझ्या बळीराजा साठी" या उपक्रम अंतर्गत मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई येथे हरभरा, रब्बी ज्वारी,तुर अवकाळी पावसानंतर पीकाची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना डॉ वसंत सुर्यवंशी, कृषी विद्यावेता , कृषी विद्यापीठ परभणी व तालुका कृषी अधिकारी श्री सूर्यकांत वडखेलकर मंडळ कृषी अधिकारी श्री अतुल वायसे