अ. भा. स. कोरडवाहु शेती संशोधन योजना व सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र
दि. 02.12.2023 रोजी *" माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत"* या उपक्रमा अंतर्गत मौजे
*आडगाव,* ता.वसमत जि. हिंगोली येथे हरभरा, रबी ज्वारी, तुर, भाजीपाला पिके यामध्ये अवकाळी पावसानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
**डॉ. हनवते,* वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी बदलत्या हवामानात पीक व्यवस्थापन व पर्यायी पिकांबाबत मार्गदर्शन केले. इतर पिकांचा पर्याय यावरही मार्गदर्शन केले.
**डाॅ. जावळे,* वरिष्ठ संशोधन सहयोगी, यांनी सेंद्रिय शेती मधील पिकांची लागवड, त्यांचं व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण सेंद्रिय पद्धतीने कसे करावे या बद्दल विस्तृत माहिती दिली. *श्री. मंगेश राऊत* , कनिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी महाराष्ट शासन द्वारे शेतकऱ्यानं करीता असलेल्या योजना याबाबत माहीती दिली.
*श्री. सुमित सूर्यवंशी,* YP1 यांनी माती परीक्षण व त्याद्वारे पसरणारे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन यावर माहीती दिली. यावेळी अडगाव येशील *श्री. सुनील चव्हाण, अजय चव्हाण, ज्ञानेश्वर वीर,* जगन्नाथ हतंगे व गणेश चव्हाण यांच्यासह
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्रमाला हजर होते. यापूर्वी प्रक्षेत्र भेट देऊन पीक पाहणी करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी *श्री. सादेक वरिष्ठ संशोधन सहयोगी,* यांनी शेतकऱयांच्या समस्या जाणुन घेतल्या.
*मुख्य समस्या :*
1. हरभरा पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव व हरभरा पीक पिवळे पडत आहे
2. सध्या कोणते पीक घेता येईल
3. तूर पिकात अळीचा प्रादुर्भाव
4. जनावरात येणारे रोग व्यवस्थापन कसे करावे.
5. हळद या पिकातील दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे. 6. सुधारित बियाणे यांची टंचाई
*यावर मार्गदर्शन करण्यात आले.
Comments
Post a Comment