मटकऱ्हाळा
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मटकऱ्हाळा ता.जि. परभणी येथे हरभरा, रबी ज्वारी,तुर या पिकांची अवकाळी पावसानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना डॉ.धर्मराज गोखले, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पी.आर.देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी, डॉ.गजानन गडदे, विस्तार कृषी विद्यावेता , डॉ.प्रभाकर पडघान प्रभारी अधिकारी सं.गौ.प्रकल्प, डॉ.रामप्रसाद खंदारे सहयोगी प्राध्यापक,श्री. एम.बी.मांडगे व.सं. सहायक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व रिलायन्स फाउंडेशनचे श्री.रामा राऊत यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती लाभली.
सदरील कार्यक्रमास मटकऱ्हाळा गावातील जवळपास 80 शेतकरी उपस्थित होते. यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रक्षेत्र भेटी देण्यात आल्या व त्यांचा समस्यांचे निराकरण करण्यात आले.
Comments
Post a Comment