कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर


कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर* तर्फे आज  *दि.०२.१२.२०२३* रोजी  *माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी* या उपक्रमा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मौजे *कुंबेफळ, मंगरूळ, पिंपरीराजा* येथे प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. 
यावेळी डॉ.अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या),
डॉ.बस्वराज पिसुरे,विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) यांनी शेतकऱ्यांना कापूस, हरभरा, रबी ज्वारी, तुर, मोसंबी, द्राक्ष, भाजीपाला पिके यामध्ये अवकाळी पावसानंतर घ्यावयाची काळजी याबाबत तसेच पशुधनाची काळजी, चारा व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपनीची गरज, केव्हीके येथे उपलब्ध विविध सुविधा याबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कृषि अधिकारी श्री.आधापुरे सर, विस्तार अधिकारी श्री.जोशी सर, दोन्ही गावातील सरपंच, कृषिसेवक, उपसरपंच, ग्रामसेवक, गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही गावात मिळून *१३० पेक्षा जास्त* शेतकरी, विद्यार्थी, महिला या अभियानात सहभागी होते. यावेळी प्रक्षेत्र भेट देऊन पीक पाहणी करण्यात आली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

 *मुख्य समस्या :* 
१.जास्त पावसामुळे पिकांमध्ये नुकसान
२.तूर पिकात अळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही.
३. सध्या कोणते पीक घेता येईल याची माहिती
४. माहिती वेळेवर भेटणे अत्यंत आवश्यक
५. मोसंबीतील बहार व्यवस्थापन कसे करावे.
६. भाजीपल्यामध्ये मर रोगाचा प्रार्दुभाव दिसत आहे.
७. जनावरात लंम्पी रोग व्यवस्थापन कसे करावे.
८. जैविक निविष्ठांची उपलब्धता 
९. ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव
१०.द्राक्ष पीक व्यवस्थापन

यावरील सर्व समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना