सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने राबविला एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम


मराठवाडा विभागांतर्गत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनामकृवि,परभणीच्या वतीने *वझुर ता.पुर्णा* जि.परभणी येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.यावेळी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या विविध पिकांची पाहणी करुन उपाय योजना सुचविण्यात आल्या. तसेच गावातील *डेअरी फार्म, रामेश्वर दूध संकलन केंद्र, अवनी फूडस् दालमिल  आदी कृषिपुरक व्यवसाय*  केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध अडचणी समजावून घेत त्यावर उपाय योजना सुचविण्यात आल्या.तसेच अवकाळी पाऊस झाल्याने उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपले मनोबल कसे वाढवावे याबाबत  *डाॅ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य ,  डाॕ.विद्यानंद मनवर आणि प्रा.ज्योती मुंडे*  यांनी उपस्थितांना सदरील प्रक्षेत्र भेटीदरम्यान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वझुर गावातील *प्रगतीशील शेतकरी रमेश पवार,नामदेव पवार,श्रीकांत शिंदे, भारत पवार,राहूल पवार* यांच्यासह गावातील 35 ग्रामस्थ  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

संशोधन संचालनालय आणि सेंद्रीय शेती संशोधन केंद्र