बळीराजासाठीचा आजचा दिवस सार्थकी ठरला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध पिकाचे संशोधन करतात हे संशोधन जेव्हा खरे शेतकऱ्याच्या शेतात डोलाने दिसेल तेव्हा ते खरे सिद्ध झाले असे म्हणता येईल
आज माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात आला यासाठी बहुतेक सर्वच कार्यालय यात उत्साहाने सहभागी झाले अगदी क्षेत्रीय कर्मचारी बांधावापासून ते थेट कुलगुरू महोदया पर्यंत सर्वच सहभागी असल्याचे दिसून आले प्रत्येक कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील गावात शेतात जावून शेतकऱ्याची आदराने विचारपूस करत चर्चा केली नुकताच अकाली पाऊस झाला ठिकठिकाणी तो खूप झाला, काही ठिकाणी गारपीट ही झाली आणि या मुळे नेमकी विद्यापीठ म्हणून काय भूमिका असावा यासाठी आदरणीय कुलगुरू डॉ इंद्रमनी सर संचालक विस्तार शिक्षण डॉ धर्मराज गोखले सर यांनी अगोदर या परिस्थितीत सर्व जेष्ठ कृषि शास्त्रज्ञाची ताते डीची बैठक मुख्यालयी परभणी येथे घेतली पीक परिस्थिती नुसार नेमकी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे उपयुक्त तंत्रज्ञान विषयानुसार कोणत्या शिफारशी आहेत त्याची चर्चा झाली मग यानुसार एक निश्चित असे या परिस्थितीत उपाय सांगितले गेले ते उपाय घेवून आज विद्यापीठाचे सर्व कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्याच्या शेतावर जावून मार्गदर्शन केले
या संकल्पाचा एक भाग म्हणून आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीने आज दिवसभर पैठण तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या या तालुक्याचे महत्वाचे फळ पीक हे मोसंबी आहे आणि त्यामुळे आज आवरजून शेतीस भेटी देवू असे डॉ सूर्यकांत पवार यांनी निश्चित केले त्यानुसार बिडकिंन धनगाव , कातपूर, वरुडी, आखतवाडा या गावातील मोसंबी व इतर पिकास भेटी दिल्या बहुतेक बागेत अजूनही मागील आंबे बहराची फळे झाडावर दिसली कुठे काढणी सुरू दिसली मग त्यांच्याशी केलेल्या सवांदावरून एक लक्षात आले की आमचे या अवकाळी पावसाने नुकसान केले असे आम्हाला म्हणता येणार नाही
आता मुदा दुसरा उपस्थित झाला अनेक फळबागा या अंबेबहर बहर धरण्यासाठी तानावर सोडल्या होत्या अशा बागायतदार शेतकऱ्याची संख्या जास्त आहे आणि यांना काळजी वाटत आहे आमचा बाग ताणावर धरला आणि हा पाऊस आला त्यामुळे आमचा बाग फुटू शकतो काय या प्रश्नाचे उत्तर डॉ पवार यांनी दिले यासाठी संजीवकाचा वापर आणि सुक्ष अन्नद्रव्याचा वापर करून आपण बागेस फळ धारणाअवस्थेत पर्यंत नेवू शकतो
या तालुक्यात तूर पीक घेणाऱ्या शेतकऱ्याची संख्या वाढत आहे कृषि संशोधन केंद्र बदनापूर निर्मित बी डी एन 711 जवळपास या तालुक्यातील सर्वच गावात पोहच होण्यासाठी विभागीय कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र हे सातत्याने मागील सहा वर्षापासून प्रयत्न करत आहे यासाठी बीज प्रक्रिया केंद्र परभणी यांची भूमिका महत्वाची ठरली त्याच बरोबर नव्याने विकसित झालेला गोदावरी तूर वान हा सध्या शेतकऱ्याचे लक्ष वेधत आहे इतका वेधत आहे की वरुडी ता पैठण हे गाव वास्तविक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे पण यांना देखील या वाणाने भुरळ घातली
श्री सोपानराव गलधर यांच्या शेतात ही दोन्हीही वान होती अगदी लगत असल्याने तूर पिकाचे निरीक्षण घेतले गेली तर गोदावरी वाणाचे भविष्य हे शेतकऱ्यासाठी भाग्य आणणार असे अनेक शेतकरी म्हणाले
या उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावरून असा ठाम विश्वास दिला की आम्ही या वाणाचे बियाणे श्री सोपानराव गळधर यांच्या कडून घेवू आणि प्रत्येक शेतकरी नक्कीच लागवड करू
हा निर्धार व्यक्त केल्यावर डॉ पवारांचा आजार दूर गेला दिवसभर अस्वस्थ वाटत होते पण या कार्यक्रमाची रूपरेषा मला त्यांनी काल निश्चित करा अशी सूचना केली होती
म्हणलो साहेब आपल्या सूचनेप्रमाणे क्षेत्रीय भेटीचा कार्यक्रम निश्चित आहे तुम्ही सहन करत आज दिवसभर चला
पण आमचा आजचा दिवस ऐतीहासिक ठरला अगदी अंगात ताप , खोकला सर्दी असूनही अगदी आजच्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंदाने वरुडी गावच्या हनुमान मंदिरात हा एक दिवस खरा सार्थकी लागला अशा माझ्या सारख्या अल्प बुध्दीच्या माणसाला वाटले
अगदी नियोजन करण्यात अनेक थोर शास्त्रज्ञ सहभागी होणार असा संदेश अगोदर फिरविला होता ऐनवेळी डॉ पवार यांनी अगदी आजारात किल्ला लढवला नुसता लढला नाही
तर विजयश्री ने गळ्यात हार घातला
त्यामुळे
गेल्या बावीस वर्षातील माझ्या कृषि विस्तार सेवेतील हा दिवस कपिलाषस्टी ठरला
आजच्या शेतकऱ्याची काही वैशिष्टे
1 बिडकिन हिवाळे बंधू यांची शेती म्हणजे चोहो बाजूने dmic औद्योगिकीकरण पण ही भावंडे मध्ये बेट प्रमाणे निष्ठापूर्वक शेती करतात नवीन घर शेतात बांधले आज योग असा त्या घराची वास्तूशांती पूजा होती आम्ही गेल्याने खूप आनंद त्यांना वाटला
2 धनगाव येथील श्री रावसाहेब पाटील कणसे यांची चाळीस वर्ष जुनी मोसंबी बाग पाहण्यात आली ही झाडे जणू आंबे वाटली
दुसरी बाब यांच्या शेतात लागवड केलेली तूर बी डी एन 711 फार विशेष वाटली
3 आखतवाडा हे गाव डाव्या कालव्याच्या शेजारी असल्याने पाण्याची कमी नाही येथील मोटकर वसती विशेष वाटली मोसंबी पासून किती समृध्दी होता येते यांचा आदर्श घेण्यासारखा आहे
माझा शेतकरी मित्र श्री मोटकर हा सकाळ पासून वाट पाहत होता फोन वर फोन करत होता यांचे शेतातील बंगले अगदी देखणे विचार त्याहून मोठे असो
4 शेवटी वरुडी गावचे सोपान देव आमची वाट पाहत होते साहेब नक्की येतील असे गावकऱ्यांना सांगत होती आम्ही पोहचलो आणि थेट गोदावरी तूर वानात गेलो ते पीक पाहून डॉ पवार अवाक झाले इतके चांगले पीक येऊ शकते असल्या या बदलत्या वातावरनात त्यामुळे अशी ही गोड विद्यापीठाची सेवा शेतकरी बांधवांना मोठी भावली
हे लिहिण्यासाठी ज्ञानोबा माऊली यांनीच प्रेरणा दिली
ही सेवा थोर कृषिषधस्त्रज्ञा डॉ श्रीनिवास यांच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो आणि थांबतो
आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी पैठण कार्यालयाची मोलाची मदत झाली
रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment