आज दि. 09.05.2024 रोजी शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी यांचे तर्फे " माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमा अंतर्गत मौजे *पेडगांव, ता. जि. परभणी येथे श्री. विजयराव जंगले यांचे शेतावर फळ पिके उदा. केळी, संत्रा, लिंबू व भाजीपाला पिकातील व्यवस्थापन तसेच खरीप पीक नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. उदय खोडके, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की खरीप हंगामाचे नियोजन करत असताना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करावी तसेच पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतीवर भर द्यावा असे मार्गदर्शन केले. जल संधारण व आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर यावर भर द्यावा असे सांगितले. यानंतर शेतकरी बंधु भगिनी यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या.* यावेळी फळ पिकांचे व्यवस्थापन, माती परीक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन व खरीप पिकांचे वाण यावर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. गोगलगाय गायीची समस्या, हुमणी कीड, चक्री भुंगा चुन...