शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी यांचे तर्फे " माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमा अंतर्गत मौजे पेडगांव, मार्गदर्शन करण्यात आले.

 




आज दि. 09.05.2024 रोजी शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी यांचे तर्फे " माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमा अंतर्गत मौजे  *पेडगांव,  ता. जि. परभणी येथे श्री. विजयराव जंगले यांचे शेतावर फळ पिके उदा. केळी, संत्रा, लिंबू  व भाजीपाला पिकातील व्यवस्थापन तसेच खरीप पीक नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 डॉ. उदय खोडके, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषि) यांनी 

मार्गदर्शन करताना सांगितले की 

खरीप हंगामाचे नियोजन करत असताना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करावी तसेच पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतीवर भर द्यावा असे मार्गदर्शन केले.

    जल संधारण व आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर यावर भर द्यावा असे सांगितले.

यानंतर शेतकरी बंधु भगिनी यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या.*

यावेळी फळ पिकांचे व्यवस्थापन, माती परीक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन व खरीप पिकांचे वाण यावर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

गोगलगाय गायीची समस्या, 

हुमणी कीड, चक्री भुंगा 

चुनखडीयुक्त जमिनीचे व्यवस्थापन यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी श्री. विजय जंगले यांच्यासह श्री. विनोद देशमुख, किरण देशमुख, प्रशांत हरकळ  व परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने एकूण 35  शेतकरी कार्यक्रमाला हजर होते. यापूर्वी केळी, संत्रा, लिंबू या पिकांत प्रक्षेत्र भेट देऊन पीक पाहणी करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.

 गत वर्षी खरीप हंगामात आढळून आलेल्या मुख्य समस्या शेतकऱ्यांकडून मांडण्यात आल्या: 

१. लिंबू पिकात छाटणीचा प्रश्न 

२. सोयाबीन व कपाशी  पिकात पैसा गोगलगायीचा प्रादुर्भाव 

3. तूर पिकात हुमणी किडीचा   प्रादुर्भाव 

४. सोयाबीन पिकावर पिवळा मोझेक

५. कपाशीत पांढरी माशी

   तसेच  फळ पिके व भाजीपाला पिकातील तंत्रज्ञानाची मागणी त्यांनी केली याशिवाय 

पीक संरक्षण यावर चर्चासत्राची मागणी करण्यात आली.

या कार्यक्रमा दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषि डॉ. उदय खोडके सर 

तसेच  डाॅ. सय्यद ईस्माईल सर, प्राचार्य, कृषि महाविद्यालय, परभणी, 

 डाॅ. डब्लु एन. नारखेडे सर ,* प्रभारी अधिकारी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, डाॅ. राजेश कदम, विभाग प्रमुख, कृषि विस्तार, 

डाॅ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख, मृदा विज्ञान,

डॉ.आनंद गोरे, सेंद्रीय शेती प्रकल्प *,

डाॅ. जी. एम. कोटे,कृषिविद्यावेत्ता, 

 डाॅ. पी. एच. गौरखेडे यांनी  विविध प्रश्नांवर माहिती दिली. 

तसेच येत्या खरीप हंगामाचे नियोजन यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई