कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील के टी जाधव व दीपक इंगोले यांनी गाढे जळगाव येथील शेतावरती भेट दिली.
एक दिवस बळीराजासाठी
दिनांक 9 मे 2024
कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील प्रभारी अधिकारी डॉक्टर के टी जाधव व डॉक्टर दीपक इंगोले वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी गाढे जळगाव येथील श्री जितेंद्र हरिभाऊ शिंदे यांच्या शेतावरती भेट दिली.
दुष्काळ परिस्थितीमुळे त्यांनी 23 शेळ्या आणि दोन गाईंची विक्री केली आहे. पाण्याचा अभाव आणि चाऱ्याची टंचाई हे दोन प्रमुख कारणे त्यांनी दिले. याशिवाय दुधाचा भाव केवळ रुपये 26 प्रति लिटर असल्याने सुद्धा दूध उत्पादन परवडत नसल्याचे सांगितले. यावर्षी साधारणता दीड एकर शेतीमध्ये वीस गुंठ्यावरती चारा उत्पादन आणि एक एकरा वरती कापूस लागवड केली होती अशी माहिती श्री शिंदे यांनी दिली
Comments
Post a Comment