दि. १०.०१.२०२४ रोजी संशोधन संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी व कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय परभणी तर्फे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमा अंतर्गत मौजे नरसापुर, ता. जि. परभणी येथे फळ पिके, हरभरा, रबी ज्वारी, करडई, तुर, कपाशी, भाजीपाला पिकातील व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख अन्वेषक सेंद्रिय शेती प्रकल्प व कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पपीता गोरखेडे मृद विज्ञान शास्त्रज्ञ, यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या चिकू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन व व सेंद्रिय पद्धतीने घेण्यात आलेल्या ज्वारी गहू या पिकांवर मार्गदर्शन केले. तसेच कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप गोविंद शिंदे यांनी सोयाबीन पिकांचे नवीन विकसित वाण व उन्हाळी पिकाची पूर्व तयारी यावर माहीती दिली तसेच बिजोत्पादन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. डॉ. सुनील जावळे वरिष्ठ संशोधन सहयोगी यांनी सेंद्रिय पद्धतीने देशी गोवंशपालन व पशुधनाचे आरोग्य याबाबत...