विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम
दिनांक 09/01/2025 रोजी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत उदगीर तालुक्यातील रावणगाव या गावात तूर पिकात शेती दिनाचे आयोजन करण्यात आले . या शेतीदिनामध्ये तूर पिकातील गोदावरी या जातीचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले . या बांधावर आयोजित केलेल्या शेती दिनामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या भागातील प्रश्न उपस्थित केले . या अनुषंगाने विद्यापिठातील शास्त्रज्ञानी आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले . विस्तार कृषि विद्यावेत्ता विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .
Comments
Post a Comment