मौजे.पळसवाडी, गल्ले बोरगाव ता खुलताबाद
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमात मौजे पळसवाडी डॉ सूर्यकांत पवार यांचे रब्बी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन. या गावात कृषि विभागाच्या आणि कृषि विद्यापीठाच्या वतीने रब्बी ज्वारीच्या पिकाचे उत्तम वान दिलेले आहे जमीन कसदार आहे तुम्ही कसणारे शेतकरी मन लावून शेतीकाम करतात यातून तुम्हाला रब्बी ज्वारीचे चांगले उत्पादन येते आता यापुढे यातून.अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी विक्रीतंत्र अवलंब करा असा सल्ला दिला. बहुतेक शेतकऱ्याच्या जमिनी या सोलापूर धुळे रस्त्यावर आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी दहा किलोच्या बॅग तयार करून या रोडजर विक्री करू शकलात तर नक्कीच अधिक रुपये आपली ज्वारीची विक्रीतून मिळेल. या शिवार फेरीत काही शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी होऊन देखील पराटी उभ्या ठेवल्या अशा शेतकऱ्यांनी त्वरित उपटून जाळून टाकावीत असा सल्ला दिला. याशिवाय हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्यांना किड व्यवस्थापन सल्ला देण्यात आला यावेळी खुलताबाद तालुक्यातील पळस वाडी, गल्ले बोरगाव, निर्गुडी *बु*आदी गावातील गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी आदी पिकाची पाहणी करत पिकाचे निदान करत सल्ला देण्यात आला यावेळी डॉ पवार यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे,रामेश्वर ठोंबरे, जी जी मुंढे याशिवाय कृषि विभागीय क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment