मौजे उजळंबा येथे उपक्रम

दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी संशोधन संचालनालय, वनामकृवि, परभणी  व कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी तर्फे  "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमा अंतर्गत मौजे  उजळंबा, ता. जि. परभणी येथे फळ पिके, हरभरा, रबी ज्वारी, करडई, तुर, कपाशी, भाजीपाला पिकातील व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी फळपिकांचे व्यवस्थापन व पर्यायी उन्हाळी पिकांवर मार्गदर्शन केले उदा. उन्हाळी तीळ, मुग, बाजरी  व बिजोत्पादन यावरही मार्गदर्शन केले. डॉ. एस. पी. मेहेत्रे  यांनी सोयाबीन पिकांचे नवीन विकसित वाण व पूर्व तयारी यावर माहीती दिली.  डॉ. ए.एस. जाधव यांनी सद्य परिस्थितीत कपाशी पिकाचे  व्यवस्थापन व वेचणी व्यवस्थापन यावर माहीती दिली . डॉ. डब्लू. एन. नारखेडे  यांनी सद्य परिस्थितीत कोरडवाहू रबी पिकाचे  व्यवस्थापन यावर माहीती दिली. डॉ.एम. एस. पेंडके   यांनी विहीर व कुपनलिका पुनर्भरण  यावर माहीती दिली. डॉ. आनंद  गोरे यांनी हरभरा पीक व्यवस्थापन व रबी ज्वार पीक व्यवस्थापन यावर माहीती दिली. डॉ. अविनाश राठोड यांनी बिजोत्पादन व घरी बियाणे तयार कसे करावे यावर माहिती दिली. डॉ. राजेंद्र जाधव यांनी रबी पिकातील कीड व्यवस्थापन यावर  माहीती दिली . डॉ. पपीता गौरखेडे यांनी  रबी पिकात फावारानीतून खत  व्यवस्थापन यावर माहीती दिली.

 डॉ. संदीप  शिंदे यांनी उन्हाळी पिकांचे वाण यावर माहीती दिली. यावेळी डॉ. सुनिल जावळे, श्री. शेख सादेक हेही उपस्थित होते.  कार्यक्रमास उजळंबा गावातील शेतकरी श्री. राजेभाउ रगड यांचे शेतावर भेट देवून लिंबू पिकातील सिट्रस क्यांकर या रोगावर काॅपर ऑक्सीक्लोराइड व स्टेप्टोसायक्लीनची फवारणी घ्यावी असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्री. राजेभाऊ रगड यांच्यासह श्री. प्रकाश मोगले, श्री. बळीराम अंबुरे, श्री. नारायण अंबुरे, श्री. सोहेल रसुल सय्यद, श्री. सालार सय्यद व परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने एकूण २७ शेतकरी कार्यक्रमाला हजर होते. यापूर्वी प्रक्षेत्र भेट देऊन पीक पाहणी करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य समस्या जसे लिंबू पिकात कॅन्‍कर रोग, तूर पिकात अळीचा प्रादुर्भाव, ज्वार पिकात बुरशी रोग, गहू पिकात पिवळेपणा तसेच उन्‍हाळी हंगामातील पीक नियोजन यावर मार्गदर्शन करण्‍यात आले .

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई