मौजे नरसापुर, ता. जि. परभणी

दि. १०.०१.२०२४ रोजी संशोधन संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी व कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय परभणी तर्फे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमा अंतर्गत मौजे नरसापुर, ता. जि. परभणी येथे फळ पिके, हरभरा, रबी ज्वारी, करडई, तुर, कपाशी,  भाजीपाला पिकातील व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रमुख अन्वेषक सेंद्रिय शेती प्रकल्प व कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पपीता गोरखेडे मृद विज्ञान शास्त्रज्ञ,  यांनी सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या चिकू फळबागेतील  अन्नद्रव्य व्यवस्थापन व व सेंद्रिय पद्धतीने घेण्यात आलेल्या ज्वारी गहू या  पिकांवर मार्गदर्शन केले. तसेच कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप गोविंद  शिंदे यांनी सोयाबीन पिकांचे नवीन विकसित वाण व उन्हाळी पिकाची पूर्व तयारी यावर माहीती दिली तसेच बिजोत्पादन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. डॉ. सुनील जावळे वरिष्ठ संशोधन सहयोगी यांनी  सेंद्रिय पद्धतीने देशी गोवंशपालन व पशुधनाचे आरोग्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना जीवामृत व फॉस्फरस या खनिजाच्या कमतरतेबद्दल माहिती देऊन त्याकरिता खनिजे समृद्ध सप्लीमेंट देण्यास सांगितले.

याप्रसंगी मौजे नरसापुर गावातील सेंद्रिय शेतीचे प्रगतिशील शेतकरी श्री दिलीपराव मुरकुटे यांचे शेतावर भेट देण्यात आली. यावेळी श्री. दिलीपराव मुरकुटे  यांच्यासह श्री. रामभाऊ गीते, श्री. बबनराव घुगे, श्री. सय्यद जावेद, श्री.नारायणराव पाटील तसेच श्रीमती सारिका ताई घुगे, श्रीमती निर्मलाबाई गीते, श्रीमती अर्चनाताई पाटील व परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने एकूण 32 शेतकरी कार्यक्रमाला हजर होते. यापूर्वी प्रक्षेत्र भेट देऊन पीक पाहणी करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.

 मुख्य समस्या : 

१. चिकू फळबागेतील  फळधारणा व फळांचा आकार 

२. उन्हाळी हंगामात कोणते पीक घेता येईल 

3. गहू पिकातील रोग व्यवस्थापन 

४. ज्वार पिकात बुरशी रोग 

५. देशी गोवंशपालनातील रोग व्यवस्थापन तसेच खनिज कमतरता मुळे उद्भवणारे आजार 

 यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना