DEE office and कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी पिंपळगाव कुटे ता.वसमत जि.हिंगोली येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमांतर्गत केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
*कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी पिंपळगाव कुटे ता.वसमत जि.हिंगोली येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमांतर्गत केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन*
मागील दोन वर्षापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ.राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम नियमित राबविण्यात येतो. यामध्ये विविध संशोधन केंद्र, महाविद्यालये व विस्तार केंद्र यांच्या शास्त्रज्ञांचे समूह त्यांच्या परिक्षेत्रातील गावामध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत एक दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, मेळावे, मार्गदर्शन कार्यक्रम असे उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार दि.12.11.2025 रोजी विस्तार शिक्षण संचालनालय, वनामकृवि, परभणी अंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्त्रज्ञांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" या उपक्रमाअंतर्गत मौजे पिंपळगाव कुटे ता.वसमत जि.हिंगोली येथे रब्बीपूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय श्री इंद्रमनी सर यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित शेतकऱ्यांची संवाद साधून मार्गदर्शन केले तसेच डॉ. गजानन गडदे, विस्तार कृषि विद्यावेत्ता यांनी हरबरा,गहू लागवड तंत्रज्ञान व उसाच्या सुपरकेन तंत्र विषयी मार्गदर्शन केले.तसेच डॉ. राकेश अहिरे, संचालक विस्तार शिक्षण, व. ना. म. कृ.वि. परभणी यांनी या वर्षी सततच्या पावसामुळे ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सचा वापर हरबरा पिकासाठी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी विस्तार विषयक बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले. कृषी विभागाचे उप कृषीअधिकारी श्री गजानन वरुडकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजना बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता गावचे सरपंच श्री राजकुमार कुटे, चांदोबा कदम अनंतराव कुटे (पोलीस पाटील ) कृषी विभागाचे श्री राजेश शेळके ,श्री प्रल्हाद चव्हाण यांनी परिश्रम घेतले.





Comments
Post a Comment