Posts

Showing posts from September, 2024

News published

Image
 

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .

Image
  दिनांक - 13  सप्टेंबर 2024          विद्यापीठाचे कुलगुरू मा . डॉ . इंद्रमणी सरांच्या संकल्पनेतून ,"माझा एक दिवस बळीराजासाठी"  या उपक्रमाअंतर्गत औसा तालुक्यातील  बोरफळ, तांबरवाडी, जवळगा, रामेगाव, खरोसा या  गावाना भेटी देऊन सोयाबीन आणि तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापना संबंधी तसेच सततच्या पावसानंतर तूर पिकात घ्यावयाची काळजी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले .        तसेच टोकण पद्धतीने बेडवर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या पेरणी यंत्रांचीही पाहणी करण्यात आली .         आजच्या उपक्रमामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री जाधव साहेब तसेच जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा . ए व्ही गुट्टे आणि जवळपास 100 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून समस्येचे निरसन करून घेतले . प्रा . ए . व्ही . गुट्टे विस्तार कृषि विद्यावेत्ता  विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .

भोसा ता. मानवत येथे एक दिवस बलिराजासोबत

Image
  भोसा ता. मानवत येथे एक दिवस बलिराजासोबत .  35 शेतकऱ्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा कापूस व हळद पिकासाठी सिंचन व खत व्यवस्थापन यावर समाज मंदिर भोसासा येथे मार्गदर्शन.  व पंचविस शेतकऱ्यांची कापूस पिकासाठी  महा डीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी नोंदणी

Soybean Research Station Team: "Maza Ek Divas Mazya Balirajyasathi"

Image
  Soybean Research Station Team: "Maza Ek Divas Mazya Balirajyasathi" visit @ Italapur, Tal. & Dist. Parbhani..

कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’

Image
  कापूस संशोधन केंद्र, नांदेड द्वारे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाअंतर्गत मौजे शेलवाडी  ता. लोहा, जि. नांदेड येथे शेतकऱ्यांच्या शेतीवर भेट देऊन हळदी पीकामध्ये बायोमिक्सचा वापर, सोयाबीन मधील मोझॅक, कपाशीतील गुलाबी बोंडअळी व बोंडसड बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांचा अकोला येथील दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील मौजे घुसर आणि आळंदा यागावी भेट देवून संपूर्ण एक दिवस बळीराजा सोबत व्यतीत केला

Image
  माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांचा  अकोला येथील दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील मौजे घुसर आणि आळंदा यागावी भेट देवून संपूर्ण एक दिवस बळीराजा सोबत व्यतीत केला. त्यांनी शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण, ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञावर भर देवून स्वयंचलित शेतीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या ऐकूण घेतल्या व त्यावर उपयोजना सुचविल्या.  

पैठण तालुक्यात तूर क्षेत्र वाढले

Image
  पैठण तालुक्यात तूर क्षेत्र वाढले वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने आणि कृषि विभागाच्या मदतीने तूर क्षेत्र विस्तार  कार्यक्रम  छ्त्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मागील  सात वर्षांपासून होत आहे खरीप 2017 मध्ये जिल्ह्यातील  नव्हे तर राज्यातील खरिपातील महत्वाचे पीक कापूस धोक्यात आले गुलाबी बाँड अळी ने मोठे नुकसान केले होते यासाठी पीक फेरपालट म्हणून विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र पैठण रोड यातील कृषि शास्त्रज्ञाने जिल्ह्यात प्रथम पैठण तालुक्यात मोठी जागृती राबविली आणि विद्यापीठ निर्मित तूर पिकाच्या वाणाची लागवड नक्कीच फायदेशीर राहील याचे अनुकरण तालुक्यातील अनेक गावात नजरेत येत आहे आज माझा  एक दिवस माझ्या बळीराजा साठी या उपक्रमात  काही गाव शिवाराचा अनुभव घेतला असता तूर क्षेत्र वाढ दिसून आली हर्षी ,दादेगाव, लिंबगाव , थेरगाव, पाचोड , रहाटगाव , नानेगव आदी गावाच्या शिवारात तूर क्षेत्र वाढ दिसून आली आजच्या चमू मध्ये डॉ एस बी पवार डॉ दिलीप हिंगोले या कृषि शास्त्रज्ञाचा समावेश होता

कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-1 माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी

Image
  कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-1 माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी  मौजे पाचोड ता. पैठण येथे मोसंबी, कापुस, तूर पिक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

एक दिवस बळीराजासाठी @ अकोला(नी) and दूधनवादी, ता बदनापूर

Image
  एक दिवस बळीराजासाठी @ अकोला(नी) ता बदनापूर एक दिवस बळीराजासाठी @ दूधनवादी(बदनापूर)

पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन केले.

Image
पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील कार्यक्रमात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे शेतकरी केंद्रित आणि त्यांच्या हितार्थ कार्य करत असून विद्यापीठाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच सद्यपरिस्थितीमध्ये जो कीड रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, त्याकरिता आठवड्यातून दोन वेळा विद्यापीठातर्फे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शास्त्रज्ञांद्वारे उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत आहे. यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. विद्यापीठ शेतकरी प्रथम हे ध्येय ठेवून कार्य करत आहे. येणाऱ्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातर्फे रबी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सदरील कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण दिले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार ,  यांनी सोन्ना येथे शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासोबतच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च हा कमी करावा जेणेकरून आपली आर्थिक जोखीम कमी करता येईल असे नमूद केले. यावेळी डॉ    गजानन ग...

कृषि विज्ञान केंद्र, खामगाव (बीड-२)

Image
  कृषि विज्ञान केंद्र, खामगाव (बीड-२) माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी उपक्रम अंतर्गत मौजे बागपिंपळगाव (वसाहत), ता. गेवराई, जि. बीड येथील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र खामगाव मार्फत रुद्रपुर तालुका जिल्हा बीड येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी घेण्यात आले. या ठिकाणी लोहयुक्त बाजरी पिकाबद्दल माहिती देण्यात आले.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम

Image
  सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी  माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम  मौजे रायपूर, तालुका व जिल्हा परभणी  - राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त प्रदर्शन आणि संतुलित आहार यावर मार्गदर्शन  - सामुदायिक विज्ञान महाविद्यालय विकसित तंत्रज्ञान माहिती  - बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती आणि जनजागृती  - शेती व्यवसायात सामाजिक माध्यमांचा वापर  - रावे 2024 आणि जिल्हा परिषद शाळा रायपुर येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून विद्यापीठ तंत्रज्ञान प्रसारासाठी जागरूकता फेरी  सहभागी शास्त्रज्ञ चार  उपस्थित शेतकरी संख्या 24  रावे विद्यार्थी 14 जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी 40