विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .

 










दिनांक - 13  सप्टेंबर 2024

         विद्यापीठाचे कुलगुरू मा . डॉ . इंद्रमणी सरांच्या संकल्पनेतून ,"माझा एक दिवस बळीराजासाठी"  या उपक्रमाअंतर्गत औसा तालुक्यातील  बोरफळ, तांबरवाडी, जवळगा, रामेगाव, खरोसा या  गावाना भेटी देऊन सोयाबीन आणि तूर पिकातील कीड व रोग व्यवस्थापना संबंधी तसेच सततच्या पावसानंतर तूर पिकात घ्यावयाची काळजी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले .

       तसेच टोकण पद्धतीने बेडवर पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या पेरणी यंत्रांचीही पाहणी करण्यात आली .

        आजच्या उपक्रमामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री जाधव साहेब तसेच जिल्हयातील तालुका कृषि अधिकारी विद्यापीठाचे विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा . ए व्ही गुट्टे आणि जवळपास 100 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून समस्येचे निरसन करून घेतले .


प्रा . ए . व्ही . गुट्टे

विस्तार कृषि विद्यावेत्ता 

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई