पैठण तालुक्यात तूर क्षेत्र वाढले
पैठण तालुक्यात तूर क्षेत्र वाढले
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने आणि कृषि विभागाच्या मदतीने तूर क्षेत्र विस्तार कार्यक्रम छ्त्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मागील सात वर्षांपासून होत आहे खरीप 2017 मध्ये जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील खरिपातील महत्वाचे पीक कापूस धोक्यात आले गुलाबी बाँड अळी ने मोठे नुकसान केले होते यासाठी पीक फेरपालट म्हणून विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र पैठण रोड यातील कृषि शास्त्रज्ञाने जिल्ह्यात प्रथम पैठण तालुक्यात मोठी जागृती राबविली आणि विद्यापीठ निर्मित तूर पिकाच्या वाणाची लागवड नक्कीच फायदेशीर राहील याचे अनुकरण तालुक्यातील अनेक गावात नजरेत येत आहे
आज माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी या उपक्रमात काही गाव शिवाराचा अनुभव घेतला असता तूर क्षेत्र वाढ दिसून आली हर्षी ,दादेगाव, लिंबगाव , थेरगाव, पाचोड , रहाटगाव , नानेगव आदी गावाच्या शिवारात तूर क्षेत्र वाढ दिसून आली
आजच्या चमू मध्ये डॉ एस बी पवार डॉ दिलीप हिंगोले या कृषि शास्त्रज्ञाचा समावेश होता
Comments
Post a Comment