पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन केले.




पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील कार्यक्रमात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे शेतकरी केंद्रित आणि त्यांच्या हितार्थ कार्य करत असून विद्यापीठाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. तसेच सद्यपरिस्थितीमध्ये जो कीड रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, त्याकरिता आठवड्यातून दोन वेळा विद्यापीठातर्फे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शास्त्रज्ञांद्वारे उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत आहे. यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. विद्यापीठ शेतकरी प्रथम हे ध्येय ठेवून कार्य करत आहे. येणाऱ्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातर्फे रबी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सदरील कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण दिले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवारयांनी सोन्ना येथे शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासोबतच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च हा कमी करावा जेणेकरून आपली आर्थिक जोखीम कमी करता येईल असे नमूद केले. यावेळी डॉ  गजानन गडदे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनीही मार्गदर्शन केले.  





Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे पुस , गिरवली तालुका आंबेजोगाई