मौजे खालापुरी, ता. शिरूर कासार येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी"
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र , खामगाव (बीड -२) व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ सप्टेंबर रोजी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" कार्यक्रम मौजे खालापुरी , ता. शिरूर कासार येथे घेण्यात आला. सदरील गावातील श्री. रामकिशन परजने यांच्या ड्रॅगन फळाच्या बागेला तसेच कॅनोपी शेतकरी उत्पादित कंपनी ला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , बीड , कृषी विद्यावेता , अंबेजोगाई , कार्यक्रम समन्वयक , विषय विशेषज्ञ (कृषि अभि.) , जिल्हा समन्वयक क्रॉपसँप , उपविभागीय कृषी अधिकारी तसेच वेगवेगळ्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी , कृषी विभागातील इतर कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.