खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्राचा विविध गावात उपक्रम

मौजे चुंबळी ता. पाटोदा, जि बीड येथे उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांनी दिनांक १ सप्‍टेंबर रोजी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या अभियाना अंतर्गत मौजे चुंबळी (ता. पाटोदा जि. बीड) येथे शेतक-यांशी संवाद साधला. कृषि विद्यापीठामध्ये संशोधित केलेले नवनविण तंत्रज्ञान, शासकीय योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शेतीतील अडचणी विषयी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी विंचरणा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक उपस्थित होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, बीड चे कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर, पशुसंवर्धन विभागाचे प्रा. किशोर जगताप आदी  उपस्थित होते.

मौजे बीड सांगवी ता. आष्टी जि. बीड येथे उपक्रम

अभियाना अंतर्गत मौजे बीड सांगवी ता. आष्टी जि. बीड येथे शेतकरी यांचे शी संवाद साधून त्यांना कृषि विद्यापीठ चे तंत्रज्ञान या बदल माहिती देण्यात आली. या भागातील मुख्य पिक कांदा असल्यामुळे शेतक-यांनी कांद्याची रोपे तयार केली. पाहणी केली असता जमिनीत बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. बुरशीचा प्रदुर्भाव  कमी होण्यासाठी बायोमिक्स व ट्रायकोडर्मा  याची आळवणी किंवा फवारणी करावी अशी माहिती देण्यात आली. कांदा पिकांच्या सुधारित वाणाचा वापर, शासनाच्या विविध योजना, शेतीपूरक व्यवसाय, पिंक विमासौर ऊर्जेवरील शेती पंप याबदल  मार्गदर्शन  करण्यात आले. यावेळी कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर, पशुसंवर्धन विभागाचे प्रा. किशोर जगताप, तालुका कृषी अधिकारी आष्टी चे श्री .जी.एल. तरटे, कृषी पर्यवेक्षक श्री. पी. जी. धस, कृषि सहाय्यक श्रीमती एच.पी.धस, आत्माची बी टीश्री.आर.ए.धोंडे ,   पोकरा चे  सौरभ साईकड आणि  गावातील शेतकरी उपस्थित होते.

मौजे आहेर चिंचोली ता. जी. बीड येथे उपक्रम

अभियान अंतर्गत मौजे आहेर चिंचोली ता. जी. बीड या गावातील शेतकऱ्याशी संवाद साधुन डॉ. बी. बी. गायकवाड यांनी किड - रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. कापुस, सोयाबीन, ऊस, मोसंबी, ड्रॅगन फ्रुटकॅबेज, मेथी या पिकाची प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जावून पाहणी केली व उपाययोजना बाबत माहिती दिली. श्री बी. आर. गंडे  तालुका कृषि अधिकारी, बीड यांनी कृषि विषयक विविध योजेनेची माहिती व अनुदानत्यामध्ये तुषार सिंचन आणि डेअरी फार्म याबदल सविस्तर माहिती दिली. कृषि पर्यवेक्षक श्री माळी कृषि सहाय्यक श्री नाईक उपस्थित होते.


सौजन्‍य : प्रा. दिप्‍ती पाटगावकर

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना