लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या उपक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातुर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिनांक २ सप्टेंबर रोजी मौजे तिवटघाळ (तालुका चाकुर) येथील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. हेमंत पाटिल, डॉ
भास्कर आगलावे व डॉ राहुल चव्हाण यांनी सोयाबीन, कापुस,
टोमैटो, सुर्यफूल, डाळींब,
मुग आदी पिकावर येणाऱ्या कीड व रोग यावरील समस्या व त्यावरील उपाय व
तसेच लागवड तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले. या परिसरात सोयाबीन व टोमेटो या पिकावर विषाणुजन्य रोग व रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला
त्यावर नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करण्याबद्दल मार्गदर्शन
करण्यात आले. शेतकरी बांधवाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेती सोबत जोड व्यवसाय
म्हणून दुगधव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, बचत गट, गटशेती
ईत्यादी उपक्रम गाव पातळीवर राबविण्याचे आवाहन ड़ॉ. हेमंत पाटील यांनी केले. सदर
कार्यक्रमास तिवटघाळ व परिसरातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमास कृषि विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे,
सरपंच काकासाहेब शिंदे, रमेश पाटील, दिलीप मटलाकुटे, निळकंठ शिंदे, नागनाथ शिंदे इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment