मौजे येल्डा येथे अंबेजोगाई (जिल्हा बीड) विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राच्या वतीने उपक्रम
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंबेजोगाई (जिल्हा बीड) अंतर्गत असलेल्या विभागीय कृषी विस्तार
शिक्षण केंद्राच्या वतीने दिनांक ०१ सप्टेंबर रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाची
सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत अतिशय डोंगरी, दुर्गम भागात
अतिशय हलक्या प्रतीची जमीन असलेल्या मौजे येल्डा ता. अंबेजोगाई येथे सौ. सुशीलाबाई
मधुकर गडदे यांच्या शेतावर भेट देण्यात आली तसेच गावातील शेतकऱ्यांशी कृषि विषयक समस्यांवर
चर्चा करण्यात आली. लाईट, पाणी व वन्यजीव प्राण्यांचा उपद्रव
व इतर या प्रमुख समस्या असल्याचे
निदर्शनास आले.
सौजन्य : डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई जिल्हा बीड
Comments
Post a Comment