बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी दिली शेतकऱ्यांच्या बांधावर भेट
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम
शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्या समस्येचे निराकरण व्हावे या उद्देशाने कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने बदनापूर तालुक्यातील विविध शेतकऱ्यांना त्यांचा बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यातून होणारे नैराश्य व आत्महत्या यांची कारणीमांसा शोधून प्रभावी कृषीविषयक धोरण तयार करण्याच्या उद्देशाने "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हे अभियान दिनांक ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान राबविण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, बदनापूर येथील शास्त्रज्ञांच्या चमूने बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी दुधनवाडी व गेवराई बाजार येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, तूर, कापूस, मोसंबी, केळी इत्यादी पिकांवरील कृषी विषयक अडचणी जाणून जाणून घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये कृषी महाविद्यालय बदनापूरचे प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. पाटील, डॉ. एस. व्हि. पवार डॉ. आर. के. साठे यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment