मौजे गलांडी (ता. औंढा नागनाथ, जिल्हा- हिंगोली) येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा नुसार मा. कुलगुरू डॉ. इंद्र मणि व विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी.बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तर्फे दि. एक सप्टेंबर रोजी राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मौजे गलांडी (ता. औंढा नागनाथ, जिल्हा- हिंगोली) येथे सेंद्रीय शेती प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरेकिटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, डॉ सुनिल जावळे आदींनी शेतकऱ्याच्या शेतावर भेट दिली, संपुर्ण दिवस शेतकरी कुटुंबासोबत राहून गावातील  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले तसेच तंत्रज्ञान विषयक घडी पत्रिकेचे वितरण केले व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

Comments