मौजे दवनगांव ता. रेनापुर जि. लातूर येथील शेतकरी बांधवाशी संवाद
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे दवनगांव ता. रेनापुर जि. लातूर येथे शेतकरी बांधवाशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये महाडीबीटी, रुंद वरंबा सरी वर सोयाबीन चे प्रात्यक्षिक पाहणी व व्यवस्थापन, शेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. उपक्रमान्तर्गत श्री प्रभाकर रामराव नागरगोजे यांच्या शेतीला भेट देऊन त्यांची पूर्ण माहिती घेण्यात आली.कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी श्री महेश क्षीरसागर, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. टाकनखार व दवनगांव गावातील ७० पेक्षा जास्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
सौजन्य : विस्तार कृषि विद्यावेत्ता लातूर
Comments
Post a Comment