अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचा उपक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत कृषी महाविद्यालय अंबाजोगाई, विभागीय कृषी विस्तार उपकेंद्र अंबाजोगाई व विभागीय कृषी कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर, परळी येल्ड, राक्षस वाडी आणि पठाण मांडवा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन अंबाजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. मोहन धुप्पे, डॉ.वसंत सुर्यवंशी, डॉ. नरेशकुमार जायेवार या शास्त्रज्ञांनी तर उपविभागीय कृषी अधिकारी श्री वळखेलकर आदींनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी सोयाबीनवर व कापसावर असणाऱ्या कीड व रोगांच्या समस्या शेतकऱ्यांनी सांगितल्या त्या समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन शास्त्रज्ञ चमूद्वारे करण्यात आले विशेषतः या परिसरात झालेल्या हुमणी किडीचे प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला असून भविष्यात विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे उत्पादन वृद्धिंगत करण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. कृषी विभागातील ग्राम पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग दिला.
सौजन्य : डॉ. नरेशकुमार जायेवार, सहाय्यक प्राध्यापक (कृषि किटकशास्त्र), कृषि महाविद्यालय
अंबाजोगाई.
Comments
Post a Comment