शेतकऱ्यांनी आपल्या पाल्याला उद्योगभिमुख कृषीचे शिक्षण घेण्याकडे वळवावे... कुलगुरू डॉ.इंद्र मणि

 



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी तर्फे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ.इंद्र मणि त्यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत' हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविण्यात येतो. त्याअंतर्गत, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे लोहगाव तालुका परभणी येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.डॉ. इंद्र मणि हे या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी कुलगुरू यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना माननीय कुलगुरू असे म्हणाले की, विद्यापीठ शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती तर देतेच परंतु त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा सदैव तत्पर असते त्या अंतर्गतच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एकातरी पाल्याला कृषीचे शिक्षण द्यावे जेणेकरून भविष्यात अशा विद्यार्थ्यातून प्रगतशील शेतकरी, कृषी उद्योजक व कार्यक्षम अधिकारी तयार होतील त्यामुळे त्या कुटुंबाची, गावाची व पर्यायाने महाराष्ट्राची आणि शेतीची सुद्धा प्रगती होईल. तसेच विद्यापीठाद्वारे चालू असलेले विविध शेतकरीभिमुख कार्यक्रमाविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अवगत केले. यावेळी माननीय कुलगुरू यांनी श्री.सिताराम देशमुख यांची कन्या कु.रेणुका देशमुख हिच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून ती गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात वडिलांना करीत असलेल्या मदतीसाठी तिचे खूप कौतुक करून तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यापीठाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख हे यावेळी बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांनी आपल्या पाल्यांना विशेषता मुलींना कृषीचे शिक्षण द्यावे जेणेकरून त्या मुली त्यांच्या दोन्हीही घरांचा उद्धार करतील. तसेच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना समाज माध्यमांचा वापर करून आपल्या कृषी उत्पादनांचे मार्केटिंग करण्याचा सल्ला दिला. विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी आपल्या मार्गदर्शनात हळद लागवड करताना हळदीचे बेड योग्य पद्धती ने केल्यास उत्पादनात कशी वाढ करता येते याविषयी सविस्तर सांगितले. तसेच त्यांनी हळदीचे खत व्यवस्थापन कसे करावे याविषयीही सविस्तर मार्गदर्शन केले. सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत यांनी यावेळी हळदी मधील कंदमाशी व करपा या रोगाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. मधुकर मांडगे यांनी यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठाच्या व्हाट्सअप हेल्पलाइनचा वापर करण्याचे आवाहन केले तसेच त्यांना विद्यापीठाच्या व्हाट्सअप हेल्पलाइनचा क्रमांक सुद्धा देण्यात आला. यावेळी श्री. सिताराम देशमुख यांच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास व अंजीर बागेस तसेच श्री. दिनकर देशमुख यांच्या हळद प्रक्षेत्रास शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी कार्यक्रमास लोहगाव, शिंगणापूर व सायाळा येथील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

KVK, Tuljapur Dist. Dharashiv - Maza Ek Diwas Mazya Baliraja sathi

मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली

गावाचे नाव - रोहिलागढ ता. अंबड जि. जालना