कृषि महाविद्यालय, लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर


बोरवटी व महापूर येथे राबविण्यात आला माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम


कार्यक्रमास कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे शेतकऱ्यांसोबत हितगुज करताना म्हणाले की, देशी गोवंश पालनातून पशुपालकांनी आत्मनिर्भर व्हावे. डॉ. विजय भामरे आपल्या मार्गदर्शनात तुर व हरबरा पिकावरील  महत्वाच्या किडी उदा. शेंगा पोखरणारी आळी, पिसारी माशी, घाटे आळी, इत्यादीबद्दल माहिती व एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे उपाय सांगून त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. अच्युत भरोसे यांनी यावेळी जैव तंत्रज्ञान काळाची गरज या विषयाबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्र कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर यांनी केले. प्रक्षेत्र भेटीस विशाल भांदर्गे, विष्णू माने, भरत नरवाडे, संजय रणखांब, शालुबाई रणखांब, विजयकुमार रणखांब, सर्जेराव शिंदे, सिधराम चव्हाण, भरतराम जाधव असे बोरवटी, महापूर, घाटनांदुर व वाकडी इत्यादी गावातील शेतकरी व पशुपालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया