विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .
आज दिनांक 11/12/2024 रोजी माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत उदगीर तालुक्यातील मोघा, लोहारा, कवूळखेड, हिप्परगा आणि शेल्हाळ गावात प्रक्षेत्र भेटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करण्यात आली व त्यानुसार सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . त्यासोबतच राज्यस्तरीय पिक स्पर्धा अंतर्गत मोघा या गावी 06 एकर क्षेत्रावर तूर पिकातील गोदावरी या वाणाचा फ्लॉट विकसीत केला आहे . या 06 एकर क्षेत्रावर परिसरातील शेतकऱ्यासाठी शेतीदिनाचे आयोजन करून गोदावरी या वानाचे महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले .
सदरिल प्रक्षेत्र भेटीमध्ये लावूर जिल्ह्यातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी / उपविभागीय कृषि अधिकारी/ सर्व तालुका कृषि अधिकारी / मंडळ कृषि अधिकारी तसेच विद्यापिठातील शास्रज्ञानी आपला सहभाग नोंदवला .
या बांधावर आयोजित केलेल्या प्रक्षेत्र भेटीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या भागातील प्रश्न उपस्थित केले . या अनुषंगाने विद्यापिठातील शास्त्रज्ञानी आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले .
विस्तार कृषि विद्यावेत्ता
विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर .
Comments
Post a Comment