Posts

Showing posts from November, 2022

मौजे गुंज, ता घनसावंगी, जिल्हा जालना

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मौजे गुंज येथे शेतकरी संवाद, यात सहभागी शास्रज्ञ डॉ एस बी पवार डॉ दिलीप हिंगोले डॉ नितीन पतंगे रामेश्वर ठोंबरे या शिवाय कृषी विभागाचे  तालुका कृषी अधिकारी घनसावंगी चे श्री राम रोडगे श्री अशोक सव्वाशे  गुंज गावचे कृषीसहायक किरण घादगिने  महाबीज जालना प्रतिनिधी दीपक यादव संपर्क शेतकरी श्री गजानन तौर.  यात हरभरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ पवार यांनी मार्गदर्शन केले  हरभरा पिकावरील कीड नियंत्रण या विषयावर डॉ नितीन पतंगे यांनी मार्गदर्शन केले डॉ दिलीप हिंगोले यांनी हरभरा पिकावरील रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक सव्वासे यांनी केले या कार्यक्रमात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोकर, जि. नांदेड

Image
Visit to  Bhokar Dist. Nanded (Farmer name : Babasaheb Bhimrao Deshmukh 9404641133) and guidance on banana disease and insect pest management by Dr. K. S. Baig, Cotton Specialist, CRS, Nanded with Dr. P. K. Dhoke and Dr. B. V. Bhede.

मौजे दरेगांव, ता औंढा, जि हिंगोली

Image
Daregaon Tq Aundha Dist Hingoli Dr B V Asewar, Dr S S Shinde, Dr G P Jagtap, Dr Bhalerao, Prof Waghmare, College of Agriculture, Golegaon

पेठ पिंपळगांव, ता पालम, जि परभणी

Image
Field Visit under Ek Diwas Balirajasathi Program to Peth Pimpalgaon Taluka Palam Dist. Parbhani and guidance on Turmeric, Cotton and Pigeon pea and Rabi crop sowing by Dr. Dr.G.D.Gadade, Extension Agronomist,ATIC &  DR. S.J. Shinde, Associate Professor (Horticulture), with Dr. D.D. Patait, Assistant Entomologist and Shri. M.B. Mandage, Senior Research Assistant, ATIC, Parbhani.

मौजे दुधनवाडी, रामवाडी आणि ढवळापुरी

Image
माझा एक दिवस बळीराजासाठी अंतर्गत कृषी महाविद्यालय बदनापूर व कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञांच्या पथकाने मौजे दुधनवाडी , रामवाडी व ढवळापुरी येथे शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन विविध पिकाविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन केले. या पथकात प्राचार्य डॉ राकेश अहिरे व वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ डी के पाटील , डॉ एन डी देशमुख , डॉ पी जी चव्हाण आदींची समावेश होता.

मौजे कुरुंदा ता. वसमत जिल्हा हिंगोली

Image
मौजे कुरुंदा ता. वसमत जिल्हा हिंगोली येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत शेतकर्‍यांच्या सोबत चर्चा करतांना संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ धर्मराज गोखले , विभाग प्रमुख ( विस्‍तार शिक्षण ) डॉ राजेश कदम , विभाग प्रमुख ( कीटकशास्त्र ) डॉ पी. एस.नेहरकर , कीटक शास्त्रज्ञ डॉ पुरुषोत्तम झंवर , डॉ गणपत कोटे , डॉ रणजित चौहान , डॉ दत्तात्रय दळवी आदी. यावेळी ४०  शेतकरी बांधव उपस्थित होते. विविध पिकां लागवडीबाबत चर्चा करून शंका समाधान करण्‍यात आले.

मौजे रामे टाकळी, तालुका: मानवत, जिल्हा: परभणी

Image
  मौजे रामे टाकळी तालुका: मानवत जिल्हा: परभणी येथे "माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" मोहिमेअंतर्गत शेतकऱ्याच्या बांधावर

मौजे कोळ पिंपरी व पांगरी, ता. धारूर, जि. बीड

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय अंबाजोगाई , विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई आणि कृषी विभाग ता. धारूर जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कोळ पिंपरी व पांगरी , ता. धारूर जि. बीड येथे भेट देऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी डॉ.एस.डी. बंटेवाड , सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कृषी महाविद्यालय आंबेजोगाई , डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी , विस्तार कृषी विद्यावेत्ता , विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई , श्री प्रा. सी. बी. अडसूळ , कीटक शास्त्रज्ञ , कृषी महाविद्यालय आंबेजोगाई तसेच श्री. शरद शिंगारे , तालुका कृषी अधिकारी धारूर जिल्हा बीड हे उपस्थित होते.

मौजे ताहेरपुर, ता पैठण, जि औरंगाबाद

Image
मौजे ताहेरपुर ता पैठण येथे एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत फळबागायतदाराना मार्गदर्शन करतांना डॉ एम बी पाटील , डॉ संजय पाटील , डॉ रवींद्र नाईनवाड , कृषी विभागाचे रामनाथजी कारले व उपस्थित शेतकरी बांधव.

मौजे फुलकळस, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मौजे फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी या गावामध्ये विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मणराव जावळे प्रभारी अधिकारी ज्वार संशोधन केंद्र डॉ. मोहम्मद इलियास डॉ. सुदाम शिराळे एकात्मिक शेती पद्धती यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने उपक्रम

Image
कृषि विज्ञान केंद्र , तुळजापूर जि. उस्मानाबाद , गृहविज्ञान विभागामार्फत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील चार गावांमध्ये शेतकरी कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण बागेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच , 120 शेतकरी कुटुंबांना भाजीपाला बियाणे संच  वाटप करण्यात आले.

मौजे सायाळा खटिंग, परभणी

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे सायाळा खटिंग येथील शेतकरी बांधव व महिला एकूण ४५ यांच्याशी शेतातील समस्या जाणुन घेऊन शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन या विषयावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी सहयोगी अधिष्ठता डॉ. आर बी क्षिरसागर , विभाग प्रमुख डॉ.विजया पवार , डॉ. प्रवीण घाडगे , डॉ.सुरेंद्र सदावते ,   डॉ. भानुदास पाटील आदीसह सरपंच , उपसरपंच व  तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते.

मौजे पान्हेरा व किंन्‍होळा ता. परभणी

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रांतर्गत सिंचन पाणी व्‍यवस्‍थापन प्रकल्‍पाच्‍या वतीने मौजे पान्हेरा व किंन्‍होळा ता. परभणी येथील शेतकरी बांधवांना हरभरा , हळद , कापूस पिकाबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ एच डब्‍ल्यु आवारी व मृदा शास्‍त्रज्ञ डॉ जी के गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

वेरूळ, तालुका- खुलताबाद, जिल्हा: औरंगाबाद

Image
मौजे वेरूळ ( तालुका: खुलताबाद जिल्हा: औरंगाबाद ) येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी विंन्टेज फार्मर प्रोडुसर कंपनी चे उदघाटन जिल्हा कृषी विकास अधिकारी ( औरंगाबाद ) मा. श्री. प्रकाश  देशमुख यांच्या हस्‍ते करण्‍यात आले . यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्‍या प्रा.गिता यादव यांनी प्रक्रिया उदयोग व पतवरी या विषयावर मार्गदर्शन केले , डॉ अनिता जिंतुरकर यांनी पशुसाठी उपयुक्त खाद्य कोबडी - शेळी खादय निर्मीती या विषयावर मार्गदर्शन केले.  एकुण ५४ शेतकरी बंधुनी सहभाग नोंदविला.

मौजे खंडाली ता. अहमदपूर जि. लातूर

Image
" माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे खंडाली ता. अहमदपूर जि. लातूर येथे ६० शेतक-याशी संवाद साधून विविध पिकांबाबत चर्चा करून शंका समाधान केले तसेच त्यांच्या कृषी विषयक   समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री सुभाष चोले , विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे , कृषि महाविद्यालय लातूर येथील प्राध्यापक डॉ विलास टाकणखार , डॉ विजय भामरे आदींची उपस्थिती होती.