“ माझा एक दिवस माझा बळीराजासोबत" या उपक्रमांतर्गत दि.१०.०१.२०२४ रोजी विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र , वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथील शास्त्रज्ञांनी मौजे सातेफळ व खंदारबन ता. वसमत जि. हिंगोली येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन विविध पिकांची पाहणी केली तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर योग्य उपाय योजना सुचविल्या. यावेळी डॉ.धर्मराज गोखले , संचालक विस्तार शिक्षण डॉ.पी.आर.देशमुख , डॉ. व्ही.एस.खंदारे डॉ.जी.डी. गडदे , डॉ.बी.एम.कलालबंडी , डॉ.डी.डी.पटाईट व श्री.मधुकर मांडगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment