मौजे गुंज, ता घनसावंगी, जिल्हा जालना
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत मौजे गुंज येथे शेतकरी संवाद, यात सहभागी शास्रज्ञ डॉ एस बी पवार डॉ दिलीप हिंगोले डॉ नितीन पतंगे रामेश्वर ठोंबरे या शिवाय कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी घनसावंगी चे श्री राम रोडगे श्री अशोक सव्वाशे गुंज गावचे कृषीसहायक किरण घादगिने महाबीज जालना प्रतिनिधी दीपक यादव संपर्क शेतकरी श्री गजानन तौर. यात हरभरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ पवार यांनी मार्गदर्शन केले हरभरा पिकावरील कीड नियंत्रण या विषयावर डॉ नितीन पतंगे यांनी मार्गदर्शन केले डॉ दिलीप हिंगोले यांनी हरभरा पिकावरील रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोक सव्वासे यांनी केले या कार्यक्रमात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment