Posts

Showing posts from October, 2022

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा मौजे माखणी येथे उपक्रम

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी  उपक्रमांतर्गत मौजे माखणी , तालुका पूर्णा येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) योजनेतील शास्त्रज्ञ डॉ. तसनिम नाहिद खान , डॉ. वीणा भालेराव , डॉ.जयश्री रोडगे आणि डॉ. शंकर पुरी आदींनी शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जाणुन घेतल्‍या आणि मार्गदर्शन केले.

बदनापुर कृषि संशोधन केंद्राचा उपक्रम

Image
कृषी संशोधन केंद्र , बदनापूर यांच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अतर्गत आज दि 3 ऑक्टोबर रोजी मौजे लोणार बाहेगाव ता. बदनापूर   या गावातील शेतकऱ्यांच्या   समस्या जाणून घेतल्या   या चमूत डॉ .दीपक पाटील , डॉ ज्ञानेश्वर मूटकुळे व डॉ प्रशांत पगार   यांचा समावेश होता. सुरवातीस श्री प्रदीप भगवान लबडे यांच्या शेतावर शेतकरी बैठक घेत शेतकऱ्यांशी संवाद करत शेतीतील प्रश्न व अडचणी   जाणून घेतल्या. डॉ.दीपक पाटील , प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र , बदनापूर यांनी तूर पिकावरील कीड व रोगाचे नियंत्रण करण्याबाबत व हरभरा लागवड तंत्रज्ञान याबाबत उपस्थित शेतकरी वर्ग यांना मार्गदर्शन केले व शिवार फेरी   घेऊन तूर पिकावरील मर रोग व इतर रोग कसेओळखायचा याबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पालम तालुक्‍यातील मौजे सायाळा येथे उपक्रम

Image
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत सायाळा तालुका पालम जिल्हा परभणी येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र अंतर्गत डॉ. जी.डी.गडदे , डॉ. डी.डी. पटाईत , तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब देशमुख , तंत्र अधिकारी गोविंद कोल्हे , पंचायत समिती कृषी अधिकारी श्री. आळणे , ची सहाय्यक श्री लोखंडे आणि गावकरी मंडळी

मौजे खेडे येथे अंबाजोगाई येथील विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राचा उपक्रम

Image
  माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई   मार्फत दि. ०३.१०.२०२२ रोजी मौजे खेड , ता. जि. उस्मानाबाद येथे भेट देऊन शेतकरी श्री. दत्तात्रय विठ्ठल टकले यांच्याशी शेतीतील विविध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. श्री. दत्तात्रय टकले हे सतत विद्यापीठातील शास्त्रज्ञ , विस्तार कृषि विद्यावेत्ता , कृषी विभागातील कृषी सहाय्यक , विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या यांच्या संपर्कात राहून शेती विषयक ज्ञान संपादन करीत असतात. गतवर्षी त्यांनी हरभरा पिकाचे ( जकी ९२१८) एकरी १८ क्विंटल विक्रमी उत्पादन घेतले आहे. विद्यापीठाचे सोयाबीन   MAUS- 71 हे वाण ते घेतात तसेच   बी बी एफ तंत्रज्ञानाचा वापर वापरासोबत कामगंध सापळ्यांचा वापर करून विविध किडींचे नियंत्रण देखील करतात. कृषि विभागाच्या पॅक हाऊस , स्प्रिंकलर यासारख्या योजनेचा ते लाभ घेत आहेत.   शेतीतील विविध अडचणी विषयी बोलताना त्यांनी प्रामुख्याने विद्युत पुरवठा नियमित नसणे तसेच रानडुकरांचा मोठा उपद्रव होणे या गोष्टीकडे लक्ष वेधले. सौजन्‍य - डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी , विस्त...

विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे किनी येल्‍लादेवी येथे उपक्रम

Image

मौजे बिल्‍डा आणि मौजे सांजुळ शिवार येथे उपक्रम

Image
"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे बिल्डा  व सांजुळ शिवार ता. फुलंब्री  जि. औरंगाबाद येथे शेतकरी बंधु- भगिनी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांची तसेच शेतिविषयक मार्गदर्शन केले. शेतकरी श्री उमेश गायके व सौ. कविता गायके यांच्या शेतात उपक्रम घेण्‍यात आला. यावेळी मुक्तगोठा चे नियोजन , चारा पिक  नियोजन , मुरघास सुधार , पशुधनाची काळजी , आहार व रोग व्यवस्थापन , फुलशेती , आद्रक , कपाशी आणि शेती पूरक जोड़धंदा , कुकटपालन , अंडी उत्पादन आदी विषयी औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रे वतीने डॉ अनिता जिंतुरकर यांनी मार्गदर्शन केले.

मौजे ताडकळस येथे उपक्रम

Image
‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ या मोहिमेअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर रोजी मौजे ताडकळस , शिरकळस , तामकळस येथे सोयाबीन , कापूस पिकाबाबत चर्चा व पाणी व्यवस्थापन , खत व्यवस्थापन व जमिनीचे आरोग्य बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले.

अन्‍नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे नांदखेडा येथे उपक्रम

Image
‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ या मोहिमेअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर रोजी अन्नतंत्र महाविद्यालयाच्‍या वतीने मौजे नांदखेडा येथे उपक्रम राबविण्‍यात आला. सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके , डॉ. राजेश क्षीरसागर , प्रा हेमंत देशपांडे , डॉ. सुरेंद्र सदावर्ते , डॉ अनुप्रीता जोशी आदींनी शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांचा समस्या जाणून घेतल्या.  यावेळी अन्नप्रक्रिये सह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री जोंधळे , प्रगतीशील प्रक्रिया उद्योजक श्री नरेश शिंदे उपस्थीत होते. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन तेथील सिंचन , निचरा व पीक उत्पादन वाढ या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शेतावरील उपस्थित महिला बचत गटातील सदस्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती दिली.

तुळजापुर तालुक्‍यातील मौजे काकंब्रावडी येथे उपक्रम

Image
  ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ कार्यक्रमांतर्गत तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने मौजे   काकंब्रावडी तालुका तुळजापूर या ठिकाणी उपक्रम राबविण्‍यात आला. यावेळी शेतकरी बांधवाना रब्बी पिक व्यवस्थापन , सेंद्रिय शेती , शेतीपूरक व्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली , कार्यक्रमात एकूण २२ शेतकरी उपस्थित होते.

परभणी तालुक्‍यातील मौजे सोनना

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम परभणी तालुक्‍यातील मौजे सोनना येथे राबविण्‍यात आला. यावेळी डॉ. पपिता गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले.

मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे भेट व मार्गदर्शन

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मौजे मंगरूळ ता.मानवत येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमा अंतर्गत शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले , प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे , विभाग प्रमुख विस्‍तार शिक्षण डॉ राजेश कदम , सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख डॉ आनंद गोरे , विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे , किटकशास्‍त्रज्ञ डॉ आनंद लाड आदींनी शेतकरी बांधवाच्‍या प्रक्षेत्रास भेट दिली , त्यांच्‍या समस्‍या जाणुन घेतल्‍या. तसेच विविध पिक पध्‍दतीवर मार्गदर्शन करण्‍यात आले. 

मौजे ब्राह्मणगाव, ता.जि. परभणी येथे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या वतीने मौजे ब्राह्मणगाव , ता.जि. परभणी येथे  "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम राबविण्‍यात आला. यावेळी संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर , डॉ. गजेंद्र लोंढे , डॉ. शिवाजी म्हेत्रे , डॉ. अशोक जाधव , डॉ. मदन पेंडके , डॉ. अमोल मिसाळ , डॉ. राजेंद्र जाधव आदींनी येथे भेट देऊन उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले तसेच प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन तेथील कीड-रोग व उत्पादन वाढ या संदर्भात मार्गदर्शन केले.

मौजे रायमोहन येथील शेतकरी बांधवाच्‍या बांधावर मार्गदर्शन

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र , खामगाव व कृषी विभाग ( शिरूर कासार ) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ या उपक्रमा अंतर्गत डोंगराळ भागातील मौजे रायमोहन येथील शेतकरी बांधवाच्‍या बांधावर   जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीविषयक असलेल्या समस्या जाणून घेण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी श्री सतीश बबन जाधव यांच्या शेतात भेट देण्यात आली. सदरील उपक्रमात कृषी विज्ञान केंद्र खामगावचे प्रा   किशोर जगताप , डॉ. तुकेश सुरपाम , श्री. राजेंद्र नेटके , तालुका कृषी अधिकारी , शिरूर कासार , श्री. संजय फरतडे , मंडळ कृषी अधिकारी , पर्यवेक्षक तसेच कृषी विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमात १७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने मौजे बुट्टेवडगाव व मौजे शेकटा येथे उपक्रम

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ मौजे बुट्टेवडगाव , ता गंगापुर व मौजे शेकटा ता गंगापुर येथे शेतकरी बांधवानसोबत. सद्यपरिस्थितीत कापुस , तुर , ओवा , आद्रक , रब्बी पिक व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात आले. डॅा किशोर झाडे व शेतकरी बांधव.

नांदेड जिल्‍हयातील मौजे उस्‍मानगर व मौजे शिराढोण येथील शेतकरी बांधवाना मार्गदर्शन

Image
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राच्या वतीने ' एक दिवस माझ्या बळीराजासाठी ' या उपक्रमांतर्गत मौ. उस्माननगर ता. कंधार जि. नांदेड व मौ. शिराढोण ता. कंधार जि. नांदेड या गावी शेतकरी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या तसेच सद्यस्थितीतील प्रश्नांच्या समस्यांचे निराकरण आणि रब्बी हंगामातील पिकांची लागवड बाबत माहिती देण्यात आली.

जिंतुर तालुक्‍यातील मौजे कुंभारी आणि मौजे मालेगाव येथे उपक्रम

Image
परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ’ या उपक्रम अंतर्गत जिंतुर तालुक्‍यातील मौ. कुंभारी व मालेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी शेतकरी बांधवाच्‍या शेती विषयक अडचणी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी जाणून घेतल्या. तसेच विद्यापीठ विकसित कृषी अवजारे आणि बाजारात उपलब्ध असलेली कृषी अवजारे याबद्दल माहिती देण्‍यात आली. कृषी विद्यापीठात चालू असलेल्या नाहेफ प्रकल्पातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबद्दल अवगत केले. ठिबक व तुषार सिंचन प्रणाली बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. सदरील कार्यक्रमात मौजे कुंभारी , मौजे मालेगाव आणि मौजे पिंपळगाव येथील शेतकरी सहभागी झाले. कार्यक्रमांमध्ये कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी येथील डॉ. पंडित मुंडे , डॉ. सुमंत जाधव , प्रा. दत्तात्रय पाटील व अनिल हरकळ आदीं मार्गदर्शन केले.

लातुर जिल्‍हयातील मौजे खुलगापुर येथील शेतकरी बांधवाशी संवाद

Image
" माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी" अभियान अंतर्गत मौजे खुलगापुर ता. लातूर जि. लातूर येथे ८० शेतक-याशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची आणि शेतिविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यात  पिक विमा योजना , रुंद वरंबा सरी वर सोयाबीनची लागवड , रबी पिक नियोजन आणि शेती पूरक जोड़धंदा - दुग्धव्यवसाय इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. उपक्रमान्तर्गत श्री राजाभाऊ त्र्यम्बक रनखांब यांच्या  शेतीला भेट देऊन त्यांची पूर्ण माहिती घेण्यात आली. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. बाबासाहेब ठोम्बरे व विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे आदीसह कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच मौजे खुलगापुर आणि मौजे हनुमंतवाड़ी गावातील शेतकरी उपस्थित होते.