मौजे खेडे येथे अंबाजोगाई येथील विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राचा उपक्रम
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत विभागीय कृषी विस्तार
शिक्षण केंद्र आंबेजोगाई मार्फत दि.
०३.१०.२०२२ रोजी मौजे खेड, ता. जि.
उस्मानाबाद येथे भेट देऊन शेतकरी श्री. दत्तात्रय विठ्ठल टकले यांच्याशी शेतीतील
विविध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. श्री. दत्तात्रय टकले हे सतत
विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विस्तार कृषि
विद्यावेत्ता, कृषी विभागातील कृषी सहाय्यक, विविध विषयातील तज्ञ मंडळींच्या यांच्या संपर्कात राहून शेती विषयक ज्ञान
संपादन करीत असतात. गतवर्षी त्यांनी हरभरा पिकाचे ( जकी ९२१८) एकरी १८ क्विंटल
विक्रमी उत्पादन घेतले आहे. विद्यापीठाचे सोयाबीन
MAUS-71 हे वाण ते घेतात तसेच बी बी एफ तंत्रज्ञानाचा वापर वापरासोबत कामगंध
सापळ्यांचा वापर करून विविध किडींचे नियंत्रण देखील करतात. कृषि विभागाच्या पॅक
हाऊस, स्प्रिंकलर यासारख्या योजनेचा ते लाभ घेत
आहेत. शेतीतील विविध अडचणी विषयी बोलताना
त्यांनी प्रामुख्याने विद्युत पुरवठा नियमित नसणे तसेच रानडुकरांचा मोठा उपद्रव
होणे या गोष्टीकडे लक्ष वेधले.
सौजन्य - डॉ. व्ही. पी. सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यापीठा विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई जि.
बीड
Comments
Post a Comment