जिंतुर तालुक्‍यातील मौजे कुंभारी आणि मौजे मालेगाव येथे उपक्रम

परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रम अंतर्गत जिंतुर तालुक्‍यातील मौ. कुंभारी व मालेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. यावेळी शेतकरी बांधवाच्‍या शेती विषयक अडचणी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी जाणून घेतल्या. तसेच विद्यापीठ विकसित कृषी अवजारे आणि बाजारात उपलब्ध असलेली कृषी अवजारे याबद्दल माहिती देण्‍यात आली. कृषी विद्यापीठात चालू असलेल्या नाहेफ प्रकल्पातील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबद्दल अवगत केले. ठिबक व तुषार सिंचन प्रणाली बाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. सदरील कार्यक्रमात मौजे कुंभारी, मौजे मालेगाव आणि मौजे पिंपळगाव येथील शेतकरी सहभागी झाले. कार्यक्रमांमध्ये कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी येथील डॉ. पंडित मुंडे, डॉ. सुमंत जाधव, प्रा. दत्तात्रय पाटील व अनिल हरकळ आदीं मार्गदर्शन केले.





Comments

Popular posts from this blog

विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र लातूर माझा एक दिवस बळीराजासाठी या उपक्रम

रामेश्वर ठोंबरे यांची माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत प्रतिक्रिया