बदनापुर कृषि संशोधन केंद्राचा उपक्रम
कृषी संशोधन केंद्र, बदनापूर
यांच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अतर्गत आज दि 3 ऑक्टोबर
रोजी मौजे लोणार बाहेगाव ता. बदनापूर या
गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून
घेतल्या या चमूत डॉ .दीपक पाटील, डॉ ज्ञानेश्वर मूटकुळे व डॉ प्रशांत पगार
यांचा समावेश होता. सुरवातीस श्री प्रदीप भगवान लबडे यांच्या शेतावर शेतकरी
बैठक घेत शेतकऱ्यांशी संवाद करत शेतीतील प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या. डॉ.दीपक पाटील, प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी तूर पिकावरील कीड व रोगाचे नियंत्रण करण्याबाबत व हरभरा
लागवड तंत्रज्ञान याबाबत उपस्थित शेतकरी वर्ग यांना मार्गदर्शन केले व शिवार
फेरी घेऊन तूर पिकावरील मर रोग व इतर रोग
कसेओळखायचा याबत सविस्तर मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment