अन्नतंत्र महाविद्यालयाच्या वतीने मौजे नांदखेडा येथे उपक्रम
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या मोहिमेअंतर्गत दि. 3 ऑक्टोबर रोजी अन्नतंत्र महाविद्यालयाच्या वतीने मौजे नांदखेडा येथे उपक्रम राबविण्यात आला. सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, डॉ. राजेश क्षीरसागर, प्रा हेमंत देशपांडे, डॉ. सुरेंद्र सदावर्ते, डॉ अनुप्रीता जोशी आदींनी शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांचा समस्या जाणून घेतल्या. यावेळी अन्नप्रक्रिये सह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री जोंधळे, प्रगतीशील प्रक्रिया उद्योजक श्री नरेश शिंदे उपस्थीत होते. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन तेथील सिंचन, निचरा व पीक उत्पादन वाढ या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शेतावरील उपस्थित महिला बचत गटातील सदस्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती दिली.
Comments
Post a Comment