मौजे रायमोहन येथील शेतकरी बांधवाच्या बांधावर मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, खामगाव व कृषी विभाग (शिरूर
कासार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझा एक दिवस माझ्या
बळीराजासाठी’ या उपक्रमा अंतर्गत डोंगराळ भागातील मौजे
रायमोहन येथील शेतकरी बांधवाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीविषयक असलेल्या समस्या जाणून घेण्यात आल्या व
मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी श्री सतीश बबन जाधव यांच्या शेतात भेट देण्यात
आली. सदरील उपक्रमात कृषी विज्ञान केंद्र खामगावचे प्रा किशोर जगताप, डॉ. तुकेश
सुरपाम, श्री. राजेंद्र नेटके, तालुका
कृषी अधिकारी, शिरूर कासार, श्री. संजय
फरतडे, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक
तसेच कृषी विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रमात १७ शेतकऱ्यांनी सहभाग
नोंदवला.
Comments
Post a Comment